"एलआयसी"ची "पीएनबी हाऊसिंग फायनान्स"मध्ये गुंतवणूक 

"एलआयसी"ची "पीएनबी हाऊसिंग फायनान्स"मध्ये गुंतवणूक 

मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) "पीएनबी हाऊसिंग फायनान्स"मध्ये 2 हजार 500 कोटींची गुंतवणूक केली आहे. अपरिवर्तनीय रोख्यांच्या (सिक्‍युअर्ड रिडीमेबल नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स) माध्यमातून ही गुंतवणूक करण्यात आली आहे.

या रोख्यांची मुदत 10 वर्षासाठी असून हा निधी दैनंदिन व्यावसायिक कामासाठी वापर करण्यात येणार असल्याचे "पीएनबी"चे व्यवस्थापकीय संचालक सतीश गुप्ता यांनी सांगितले. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये "पीएनबी"ने दुसऱ्यांदा रोख्यांच्या माध्यमातून निधीची उभारणी केली आहे.

यापूर्वी कंपनीने विदेशी बॅंकेकडून 500 कोटींचा निधी उभारला होता. चालू आर्थिक वर्षात कंपनीने मुदत ठेवी, कर्जरोखे आणि इतर दीर्घ कालीन गुंतवणूक साधनांच्या माध्यमातून तब्बल 27 हजार कोटींचे भांडवल निर्मिती केली आहे. यामुळे कंपनीची रोखतेची स्थिती भक्कम होऊन मालमत्ता देयता व्यवस्थापन देखील सुधारले असल्याचे गुप्ता यांनी सांगतिले. 

web title : LIC's invested in "PNB Housing Finance"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com