Stock Split : दोन वर्षात 200% रिटर्न, 'या' कंपनीने केली शेअर्स स्टॉक स्प्लिटची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Stock Split

Stock Split : दोन वर्षात 200% रिटर्न, 'या' कंपनीने केली शेअर्स स्टॉक स्प्लिटची घोषणा

लिखिता एन्टरप्रायझेस लिमिटेडने (Likhitha Infrastructure Ltd)  त्यांच्या शेअर्सचे स्टॉक स्प्लिट जाहीर केले आहे. कंपनीने बुधवारी स्टॉक एक्सचेंजला पाठवलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. कंपनीने 1:2 च्या प्रमाणात प्रत्येक शेअर्सचे स्प्लिट करण्याचे ठरवले आहे.

म्हणजेच, जर एखाद्या गुंतवणूकदाराकडे कंपनीचा एक शेअर असेल, तर स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर दोन शेअर्स असतील. स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड तारीखही निश्चित केल्याचे लिखिता इन्फ्रास्ट्रक्चरने सांगितले. कंपनीने प्रत्येकी 10 रुपये फेस व्हॅल्यूचे इक्विटी शेअर्स प्रत्येकी 5 रुपयांच्या दोन शेअर्समध्ये स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याची तारीख 2 डिसेंबर 2022 निश्चित केली आहे. (Likhitha Infrastructure Ltd declared share Stock Split 200 percent return in two years)

स्टॉक स्प्लिट म्हणजे काय ?

स्टॉक स्प्लिट म्हणजे शेअर्सचे विभाजन. जेव्हा शेअर्सची किंमत जास्त असते तेव्हा कंपनी लहान गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आपले शेअर्स स्प्लिट करते. यामुळे शेअर्सची किंमत स्वस्त होते आणि कंपनीच्या एकूण शेअर्सची संख्या वाढते.

म्हणजे, जर एखाद्या शेअरची किंमत 1000 रुपये असेल आणि कंपनीने तो शेअर 1:1 च्या प्रमाणात स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्या कंपनीच्या भागधारकाला प्रत्येक शेअरच्या बदल्यात एक अतिरिक्त शेअर जारी केला जाईल. पण शेअर्सची किंमत निम्मी होईल म्हणजेच 500 रुपये होईल. म्हणजेच, प्रति शेअर किंमत कमी होईल, पण शेअरहोल्डर्लच्या शेअर्सची किंमत आणि कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन समान राहील.

हेही वाचा: Jalgaon Rice Stock Case: पंचनाम्यात रेशन तांदळाच्या शासकीय गोण्या निष्पन्न

दोन वर्षात 200% रिटर्न

लिखिता इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स मल्टीबॅगर शेअर्समध्ये मोडतात. या शेअर्सने 2 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 200% परतावा दिला आहे. कंपनीचे शेअर्स बुधवारी 5.18 टक्क्यांच्या वाढीसह एनएसईवर 409.00 रुपयांवर बंद झाले.

त्याच वेळी दोन वर्षांपूर्वी अर्थात 16 ऑक्टोबर 2020 रोजी, त्याचे शेअर्स पहिल्यांदाच एनएसईवर 136.90 रुपयांच्या किंमतीवर लिस्ट झाले होते. लिखिता इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स गेल्या एका वर्षात 17.26 टक्क्यांनी वाढले आहेत. तर गेल्या 6 महिन्यांत त्याचे शेअर्स सुमारे 50.31% ने वाढले आहेत.

हेही वाचा: Share Market : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

नुकत्याच संपलेल्या सप्टेंबर तिमाहीत लिखिता इन्फ्रास्ट्रक्चरचे नेट प्रॉफीट 40.66% ने वाढून 14.60 कोटी रुपयांवर पोहोचले, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 10.38 कोटी होता. सप्टेंबर तिमाहीत कंपनीची एकूण विक्री 41.06% ने वाढून 82.96 कोटी झाली आहे, जी मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 58.81 कोटी होती.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.