बँकांची कामे दोन दिवसात उरकून घ्या; शनिवारपासून ७ दिवस बँका राहणार बंद

Bank
Bank

नवी दिल्ली : बँकेशी संबंधित काही कामे शिल्लक असतील, तर ती दोन दिवसांत पूर्ण करून घ्या. कारण सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील सर्व बँका २७ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान सात दिवस बंद राहणार आहेत. बँकेशी संबंधित सर्व कामे करण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवार हे दोनच दिवस सध्या मिळणार आहेत. 

२७ मार्चला चौथा शनिवार, २८ मार्चला रविवार आणि २९ मार्चला होळी असल्यामुळे बँका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आपल्या अधिकृत वेबसाईटवर होळीच्या सुट्टीचाही उल्लेख केला आहे. 

रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, ३० मार्च रोजी फक्त पाटणा (बिहार) मधील बँका बंद ठेवल्या जातील. तर उर्वरित देशाभरात बँका सुरू राहतील. पाटण्यामध्ये २७ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान फक्त ३० मार्च आणि ३ एप्रिल या दोन दिवशी बँका सुरू राहणार आहेत. 

३१ मार्चला सर्व बँका सुरू असतील पण त्यामध्ये खातेधारकांना प्रवेश नसेल. कारण आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी समापनाचे कामकाज (क्लोजिंग) बँकांमध्ये केले जाईल. 

मार्च २०२१ महिन्यामधील बँकेच्या सुट्ट्या पुढीलप्रमाणे - 

२७ मार्च - महिन्याच्या चौथ्या शनिवारमुळे सुट्टी
२८ मार्च - रविवार
२९ मार्च - होळी 
३० मार्च - पाटण्यात होळी साजरी करण्यासाठी सुट्टी, उर्वरित भारतात बँका खुल्या राहतील.
३१ मार्च - आर्थिक वर्ष बंदमुळे सुट्टी

या व्यतिरिक्त एप्रिल २०२१ मध्ये क्लोजिंग ऑफ अकाउंट्समुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १ एप्रिल रोजी सुट्टीची अधिसूचना जारी केली आहे. २ एप्रिलला गुड फ्रायडे असल्याने बँका बंद राहतील तर पुन्हा ४ एप्रिलला रविवार आहे. पण या सर्व बँकांच्या सुट्ट्यांमध्ये इंटरनेट बँकिंग सेवा सुरू राहणार आहेत.

- अर्थविश्वातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com