Share Market Closing : सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीसह बंद; बँकिंग शेअर्समध्ये झाली वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market

Share Market Closing : सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीसह बंद; बँकिंग शेअर्समध्ये झाली वाढ

Share Market Closing : जागतिक बाजारातील वाढीच्या अनुषंगाने आज बाजार तेजीसह उघडला. आज सेन्सेक्स 360 अंकांच्या वाढीसह 61779 स्तरावर तर निफ्टी 81 अंकांच्या वाढीसह 18325 पातळीवर उघडला. बँक निफ्टी 211 अंकांनी वाढून 42668 वर आहे. कोटक महिंद्रा बँक, डॉ रेड्डी, विप्रो आणि मारुती यांसारखे शेअर्स तेजीत आहेत. आयटीसी, एनटीपीसी, महिंद्रा अँड महिंद्रा आणि हिंदुस्थान युनिलिव्हर या समभागांमध्ये घसरण झाली.

हेही वाचा : Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

हेही वाचा: Paytm Shares Crash : पेटीएमच्या शेअर्समध्ये विक्रमी घसरण; 1.07 लाख कोटींचे नुकसान, 'हे' आहे कारण

आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स 91 अंकांच्या वाढीसह 61510 वर बंद झाला, तर निफ्टी 23 अंकांच्या वाढीसह 18267 वर बंद झाला. निर्देशांकाबद्दल बोलायचे झाले तर मीडिया, बँकिंग, पीएसयू बँक आणि हेल्थकेअर निर्देशांकाची कामगिरी चांगली होती. टॉप-30 सेन्सेक्समध्ये 13 शेअर्स वाढीसह आणि 17 घसरणीसह बंद झाले. बजाज फायनान्स, डॉ. रेड्डी, स्टेट बँक आणि मारुती या समभागांनी तेजी घेतली. त्याच वेळी पॉवरग्रीड, टेक महिंद्रा आणि टायटन या समभागांमध्ये घसरण झाली. आज डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला. रुपया 18 पैशांनी घसरून 81.85 वर बंद झाला.

ज्या समभागांमध्ये तेजी आहे त्यात SBI 1.44%, बजाज फायनान्स 1.43%, डॉ. रेड्डीज लॅब 1.31%, कोटक महिंद्रा 0.85%, सन फार्मा 0.76%, मारुती सुझुकी 0.74%, NTPC 0.60%, अॅक्सिस बँक 0.5% , ICICI बँक 0.45 टक्क्यांनी, HDFC 0.43 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

ज्या समभागांमध्ये घसरण आहे त्पॉयात वर ग्रिड 1.08 टक्के, टेक महिंद्रा 0.66 टक्के, भारती एअरटेल 0.54 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.51 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.50 टक्के, एचयूएल 0.45 टक्के, 0.39 टक्के. , रिलायन्स 0.31 टक्के, नेस्ले 0.31 टक्के TCS 0.28 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.