ब्रोकरच्या मदतीने Loan घेताय! ही काळजी घ्या

ब्रोकरकडून कर्ज घेताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते.
Loan Tips From Broker
Loan Tips From Broker esakal

दिवसेंदिवस महागाई खूपच वाढते आहे.आहे त्या पगारात घर चालवणे अनेकांना कठीण जाते आहे. पण, अतिरिक्त खर्च करणे उदा- नवे घर घेणे, दुकान घेणे, गाडीची खरेदी किंवा इतर महत्वाची खरेदी करणे कधीतरी महत्वाचे होऊन जाते. अशावेळी लोकं बॅंकेकडून कर्ज घेणे पसंत करतात. बॅंका आणि फायनान्शिअल कंपन्या ग्राहकांना होम लोन, पर्सनल लोन, कार लोन आदी सुविधा देतात. पण सिबिल स्कोर खराब असल्याने किंवा इतर काही कारणांमुळे गरजेप्रमाणे लोकांना कर्ज मिळत नाही. अशावेळी लोकं ब्रोकरच्या मदतीने कर्ज घेतात. पण ब्रोकरकडून कर्ज घेताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते.

Loan Tips From Broker
कॅब चालक निघाला Uberचा मालक!

ही घ्या काळजी

लेखी स्वरूपात सर्व काम करा- ब्रोकरच्या मदतीने ज्याप्रकारचे कर्ज घेणार आहात त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे. कर्जाच्या परतफेडीवरील व्याजाची योग्य माहिती घेणे गरजेचे आहे. पण ही माहिती लिखित स्वरूपात घेणे अत्यंत महत्वाचे आहे. अनेकदा ब्रोकर कमिशन मिळविण्यासाठी तुम्हाला अनेक आश्वासने देतो. पण त्यांनंतर शब्द पाळत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे डॉक्युमेंटेशन करणे गरजेचे आहे.

Loan Tips From Broker
आशिष शेलारांनी भाषणात उल्लेख केलेला तुषार प्रिती देशमुख कोण आहे ?
loan
loanesakal

कुठल्याही कागद पत्रांवर सही करताना माहिती घ्या- अनेकदा ब्रोकर्स लोकांकडून कमिशन मिळविण्यासाठी मोठ्या मोठ्या बाता करतात. पण, मूळ दस्तऐवजात त्या गोष्टी कायम राहतात. अशावेळी कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रावर सही करण्यापूर्वी ती नीट वाचा. त्यानंतरच सही करा. असे केल्याने कोणतीही अडचण येणार नाही.

Loan Tips From Broker
उष्माघातापासून संरक्षण मिळवायचंय! या पाच गोष्टी करा|Heat Wave Care
loan
loanSakal

ब्रोकरला आधी कमिशन देऊ नका- ब्रोकरमार्फत कर्ज घेताना काही गोष्टींची काळजी घेणे गरेजेचे आहे. कर्ज मिळेपर्यंत ब्रोकरला कमिशन देऊ नका. साधारणपणे कर्जासाठी ब्रोकर ५ ते १० टक्के कर्ज घेतात. जर कमिशन दिल्यानंतर कुठल्याही कारणामुळे तुमचा प्लॅन रद्द झाला तर एकदा त्याला दिलेले पैसे तो पुन्हा तुम्हाला परत देणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा तुमच्या खात्यात कर्जाची रक्कम येऊ द्या. त्यानंतरच कमिशन द्या. महत्वाचे म्हणजे ब्रोकरची आधीची पार्श्वभूमी कशी आहे याविषयी योग्य माहिती मिळणेही खूप गरजेचे आहे.

Loan Tips From Broker
थोडंसं चालून दम लागतोय! असू शकतात ५ कारण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com