Credit Card : क्रेडिट कार्ड चोरी किंवा हरवल्यास होऊ शकते लोखोंचे नुकसान; लगेच करा 'या' गोष्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

credit Card

Credit Card : क्रेडिट कार्ड चोरी किंवा हरवल्यास होऊ शकते लोखोंचे नुकसान; लगेच करा 'या' गोष्टी

Credit Card Apply : सध्या क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. लोकांना क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्यासाठी बँका अनेक सुविधा देतात. क्रेडिट कार्ड वापरल्यामुळे अनेक ऑफर देखील मिळतात. क्रेडिट कार्डमध्ये क्रेडिट मर्यादा असते, ज्याचा वापर करून तुम्ही पेमेंट करू शकता आणि नंतर क्रेडिट कार्डचे बिल भरू शकता. जर तुमचे क्रेडिट कार्ड हरवले किंवा चोरीला गेले, तर तुम्ही या 5 गोष्टी लवकर करा जेणेकरून तुमच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर होणार नाही.

तुमचे क्रेडिट कार्ड हरवण्याची कोणतीही घटना घडल्यास, तुम्ही तात्काळ काही पावले उचलली पाहिजेत कारण तुम्ही जर उशीर केला तर तुमच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते.

हेही वाचा : मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

1. कार्ड हरवल्यास बँकेला त्वरित कळवा आणि कार्ड ब्लॉक करा-

तुमचे क्रेडिट कार्ड हरवले आहे किंवा तुमचे क्रेडिट कार्ड चोरीला गेले आहे हे समजताच, तुम्ही ज्या बँकेकडून किंवा संस्थेकडून क्रेडिट कार्ड घेतले आहे त्या बँकेला ताबडतोब कळवा. त्यांना माहिती देऊन, तुमचे क्रेडिट कार्ड ब्लॉक करा जेणेकरून त्याचा गैरवापर होऊ नये. यानंतर तुम्ही डुप्लिकेट कार्डसाठी अर्ज करा.

2. एफआयआर करा-

बँकेला माहिती दिल्यानंतर, तुम्ही क्रेडिट कार्ड हरवल्याबद्दल एफआयआर करा. एफआयआर करून घेणे म्हणजे तुमच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर झाला तर त्यासाठी तुम्ही जबाबदार राहणार नाही. यासोबतच तुमच्याकडे कायदेशीर पुरावाही असेल, ज्याचा वापर करून तुम्ही डुप्लिकेट क्रेडिट कार्ड मिळवू शकता.

हेही वाचा: Income from Social Media : फक्त दिवसभर सोशल मीडियावर स्क्रोलींग करून कमवा लाखो रुपये! अनेक लोकं झाले आहेत श्रीमंत

3. तुमच्या क्रेडिट ब्युरोशी संपर्क साधा-

तुम्ही तुमच्या क्रेडिट ब्युरोशी संपर्क साधावा आणि त्यांना तुमचे क्रेडिट कार्ड हरवल्याची माहिती द्यावी. त्यांनतर जर एखाद्या व्यक्तीद्वारे कार्डचा गैरवापर झाला तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर त्याचा परिणाम होणार नाही. तुम्ही तुमचा क्रेडिट रिपोर्ट देखील तपासावा आणि तुम्हाला कोणतीही चुकीची माहिती आढळल्यास क्रेडिट ब्युरोला कळवावी.

4. तुमच्या क्रेडिट स्टेटमेंटवर बारीक लक्ष ठेवा-

तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड हरवल्याची तक्रार तुमच्या बँकेला केली असली तरीही तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड स्टेटमेंटवर काळजीपूर्वक लक्ष ठेवावे. तुम्हाला कोणताही व्यवहार संशयास्पद वाटल्यास, तुम्ही ताबडतोब तुमच्या बँकेशी संपर्क साधून तक्रार करू शकता.

5. क्रेडिट कार्ड आवश्यक असेल तेव्हाच पुन्हा अर्ज करा-

क्रेडिट कार्डसाठी पुन्हा अर्ज करण्यापूर्वी, तुम्हाला त्याची गरज आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे. अनेक वेळा क्रेडिट कार्डचा वापर तुम्ही करत नाही. त्यामुळे पुन्हा अर्ज करण्यापूर्वी याचा विचार करावा. तुम्हाला हे माहित असले पाहिजे की तुमचे क्रेडिट कार्ड ब्लॉक केल्यानंतरही ते सक्रिय राहते जे तुम्हाला पुन्हा अर्ज करण्याची परवानगी देते. तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत नसाल तर तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड खाते निश्चितपणे बंद करणे फायद्याचे आहे. त्यामुळे तुमचे पैसे वाचण्यास मदत होऊ शकते.