सार्वजनिक बँकांचा पाय खोलात 

वृत्तसंस्था
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी नुकतेच जुलै ते सप्टेंबर 2018 या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. मात्र रिझर्व्ह बँकेकडून एनपीए कमी करण्यासाठी  करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि केंद्र सरकारकडून सातत्याने मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक होऊनही बँकांचा तोटा वाढ चालला आहे. सरलेल्या जुलै ते सप्टेंबर तिमाहीत बँकांना 14 हजार 716.2 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीच्या तुलनेत बँकांच्या तोट्यात साडेतीन पटीने वाढ झाली आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना 4 हजार 284.45 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी नुकतेच जुलै ते सप्टेंबर 2018 या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. मात्र रिझर्व्ह बँकेकडून एनपीए कमी करण्यासाठी  करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि केंद्र सरकारकडून सातत्याने मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक होऊनही बँकांचा तोटा वाढ चालला आहे. सरलेल्या जुलै ते सप्टेंबर तिमाहीत बँकांना 14 हजार 716.2 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीच्या तुलनेत बँकांच्या तोट्यात साडेतीन पटीने वाढ झाली आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना 4 हजार 284.45 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. शिवाय बँकांच्या खराब कामगिरीमुळे शेअर बाजारातील बँकांच्या शेअरची कामगिरी देखील घसरली आहे. बहुतांश बँकांचे शेअर 52 आठवड्यातील नीचांकी पातळीजवळ व्यवहार करत आहे. 

पंजाब नॅशनल बँकेला सर्वाधिक तोटा: 
सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) सरलेल्या तिमाहीत सर्वाधिक तोटा झाला आहे. बँकेला 4 हजार 532.65 कोटींचा तोटा झाला आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी पीएनबीमध्ये केलेल्या गैरव्यवहारामुले बँकेला 14 हजार कोटींचा फटका बसला आहे. मात्र  गेल्या वर्षी याच तिमाहीत  बँकेला 560.58 कोटी रुपयांचा नफा झाला होता. बँकेने सरलेल्या तिमाहीत थकित कर्जांसाठी 9 हजार757 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र ल्या वर्षीच्या याच तिमाहीत बँकेने थकित कर्जांसाठी 2 हजार 440.79 कोटी रुपयांची तरतूद केली होती. पीएनबी पाठोपाठ आयडीबीआय बँकेला 3 हजार 602.35 कोटी, अलाहाबाद बँकेला 1  हजार 822.71 कोटींचा तोटा झाला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Losses of PSU banks widens nearly 3.5 times in Q2 to Rs 14,716.2 cr