
एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी घट, पण सर्वसामान्यांना दिलासा नाहीच!
एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर झाले आहे. आज इंडेनचे सिलिंडर दिल्लीत १९८ रुपयांनी स्वस्त झाले आहे. एलपीजी (LPG) सिलिंडरच्या दरामध्ये कोलकात्यात १८२ रुपयांनी घट झाली आहे. दुसरीकडे मुंबईत १९०.५० रुपये, तर चेन्नईत १८७ रुपयांनी घट झाली आहे. पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑईलने (Indian Oil) कमर्शियल सिलिंडरच्या दरातही कपात केली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder) ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. १४.२ किलोचा घरगुत सिलिंडर स्वस्त झालेला नाही. आताही तो १९ मे रोजीच्या दरानेच मिळत आहे. (LPG Price 1st July LPG Cylinder Price Cut Down By 198 From Today)
हेही वाचा: Ujjwala Yojana: मोफत मिळेल एलपीजी गॅस कनेक्शन, घरबसल्या असा करा अर्ज
मे महिन्यात भडका
जूनमध्ये इंडेनने कमर्शियल सिलिंडर १३५ रुपयांनी स्वस्त केला होता. दुसरीकडे मे महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या ग्राहकांना दोन वेळेस फटका बसला होता. घरगुती सिलिंडरचे दर महिन्यात पहिल्यांदाच ७ मे रोजी ५० रुपयांनी वाढवले गेले होते. १९ मे रोजी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली होती.
शहरनिहाय १४.२ किलोच्या सिलिंडरचे दर रुपयात (राऊंड फिगरमध्ये)
दिल्ली १,००३
मुंबई १,००३
कोलकाता १,०२९
चेन्नई १,०१९
लखनौ १,०४१
जयपुर १,००७
पाटणा १,०९३
इंदूर १,०३१
अहमदाबाद १,०१०
पुणे १,००६
गोरखपुर १०१२
भोपाळ १००९
आग्रा १०१६
रांची १०६१
स्रोत : IOC
हेही वाचा: महागाई : जागतिक बँकेने भारताचा आर्थिक विकास दर कमी केला
एका वर्षात १६८.५० रुपयांनी महागला घरगुती एलपीजी सिलिंडर
दिल्लीत गेल्या एका वर्षात घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर ८३४.५० रुपयांनी वाढून १००३ रुपयांवर पोहोचले आहे. १४.२ किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडरचे दरात शेवटची वाढ ४ रुपयांनी १९ मे २०२२ रोजी झाली होती. या पूर्वी दिल्लीत ७ मे रोजी दर ९९९.५० रुपये प्रति सिलिंडर होते. २२ मार्च २०२२ चे दर ९४९.५० रुपयांच्या तुलनेत सात मे रोजी एलपीजी सिलिंडर ५० रुपयांना महाग झाला होता. २२ मार्च रोजी सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ झाली. यापूर्वी ऑक्टोबर २०२१ ते २०२२ पर्यंत घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर दिल्लीत ८९९.५० रुपयांवर पोहोचले होते.
Web Title: Lpg Price 1st July Lpg Cylinder Price Cut Down By 198 From Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..