महागाई : जागतिक बँकेने भारताचा आर्थिक विकास दर कमी केला

World Bank slows Indias economic growth
World Bank slows Indias economic growthWorld Bank slows Indias economic growth
Updated on

नवी दिल्ली : जागतिक बँकेने (World Bank) चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज ७.५ टक्क्यांवर आणला आहे. यापूर्वी २०२२-२३ मध्ये भारताचा आर्थिक विकास दर ८.७ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. (World Bank slows Indias economic growth)

वाढत्या महागाईचा (Inflation) दबाव, पुरवठा साखळीतील अडथळे आणि भू-राजकीय तणावामुळे निर्माण होणारी आव्हाने लक्षात घेऊन भारताच्या विकास दराचा अंदाज वर्तवला आहे, असे जागतिक बँकेने मंगळवारी ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्सच्या आर्थिक संभावनांवरील आपल्या अहवालात म्हटले आहे.

World Bank slows Indias economic growth
नूपुर शर्मा म्हणाल्या, मी संघटनेत वाढलेली; पक्षाचा निर्णय मान्य

२०२३-२४ या आर्थिक वर्षातही भारताचा विकास दर ७.१ टक्के राहील, असा जागतिक बँकेचा अंदाज आहे. हे मागील अंदाजापेक्षा ०.३० टक्के जास्त आहे. मागील अंदाज ६.८ टक्के होता. अहवालात अंदाज आहे की २०२४-२५ या वर्षात भारताचा जीडीपी ६.५ टक्के असू शकतो.

जागतिक बँकेने (World Bank) २०२२ साठी जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज ४.१ टक्क्यांवरून २.९ टक्क्यांवर आणला आहे. जागतिक बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, जागतिक वाढ २०२१ मध्ये ५.७ टक्क्यांवरून २०२२ मध्ये २.९ टक्क्यांवर येऊ शकते. या जागतिक वित्तीय संघटनेने जानेवारीमध्ये २०२२ च्या जागतिक आर्थिक वाढीचा अंदाज ४.१ टक्के वर्तवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

World-Class Kayaking Destination in the Making: Uttarakhand Attracts International Athletes
Maharashtra Latest Marathi News Live Update
Lucknow’s Royal Bone Art Tradition Creates Luxury Handicrafts Worth Lakhs
Thalapathy Vijay Divorce Case tamilnadu court
Marathi News Esakal
www.esakal.com