New Year Economics News : नव्या वर्षात येणार 'Survival Technology' चा आयपीओ, वाचा सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Year Economics News

New Year Economics News : नव्या वर्षात येणार 'Survival Technology' चा आयपीओ, वाचा सविस्तर

नव्या वर्षात कोणता आयपीओ येणार असा विचार तुम्ही करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. स्पेशालिटी केमिकल बनवणाऱ्या सर्व्हायव्हल टेक्नॉलॉजीजने (Survival Technologies) बाजार नियामक सेबीकडे आयपीओसाठी अर्ज दाखल केला आहे.यातून 1000 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे.

कंपनी 200 कोटी किमतीचे नवीन इक्विटी शेअर जारी करेल असे डीआरएचपीने सांगितले. प्रमोटर आणि विद्यमान गुंतवणूकदार ऑफर फॉर सेलमधील (OFS) त्यांचे स्टेक विकतील. ऑफर फॉर सेलमध्ये 800 कोटी रुपयांचे शेअर्स विकले जातील. (IPO)

ऑफर फॉर सेलमध्ये, विजयकुमार रघुनंदन प्रसाद अग्रवाल रुपये 544.41 कोटी, निमाई विजय अग्रवाल रुपये 212.41 कोटी आणि प्रभा विजय अग्रवाल 43.18 कोटी रुपयांचे शेअर्स विकतील. ड्राफ्ट पेपरनुसार, कंपनी प्री-आयपीओ प्लेसमेंट एक्सप्लोर करू शकते. असे झाल्यास नवीन आयपीओचा आकार कमी होण्याची शक्यता आहे.

कंपनी आयपीओमधून उभी केलेली रक्कम सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी आणि वर्किंग कॅपिटलसाठी वापरेल. या अंतर्गत 175 कोटी रुपये वर्किंग कॅपिटलच्या गरजा आणि इतर सामान्य कॉर्पोरेट कामांसाठी वापरले जातील. मुंबईस्थित कंपनी भारतात स्पेशालिटी केमिकल फोकस्ड कॉन्ट्रॅक्ट रिसर्च अँड मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेसवर (CRAMS) काम करते.

मार्च 2022 ला संपलेल्या आर्थिक वर्षात, कंपनीचा पीएटी 73.46 कोटी रुपये होता, तर ऑपरेशन्समधील उत्पन्न वाढून 311.78 कोटी रुपये झाले. मागील वर्षी कंपनीचे उत्पन्न 274.79 कोटी रुपये होते. आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर जेएम फायनान्शियल आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज आहेत. इश्यू बंद झाल्यानंतर कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होतील.

हेही वाचा: Share Market : 65 पैशांचा 'हा' शेअर पोहोचला 306 रुपयांवर; तुमच्याकडे आहे का हा शेअर?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.