

मुंबई : तरुणांमध्ये लोकप्रीय असलेल्या मॅकडोनाल्ड (macdonald's) रेस्टोरंटची मुख्य कंपनी असलेल्या वेस्टलाईफ डेव्हलपमेंटतर्फे (Westlife development) येत्या तीन ते पाच वर्षांत एक हजार कोटी रुपयांची गुंतवणुक (one thousand crore investment) करून आपल्या रेस्टोरंटची संख्या सहाशेपर्यंत नेली जाईल. मॅकडोनाल्ड ने भारतातील आपले पहिले रेस्टोरंट वांद्रे (bandra first restaurant) येथे सुरु केल्यास मागील आठवड्यात पंचवीस वर्षे झाली. त्यानिमित्ताने सकाळ कडे संवाद साधताना उपाध्यक्ष अमित जातिया (Amit jatia) यांनी ही माहिती दिली. या विस्तारामुळे मॅकडोनाल्ड तर्फे आणखी दहा हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार दिला जाईल, असेही ते म्हणाले. सध्या पश्चिम आणि दक्षिण भारतात मॅकडोनाल्डची सुमारे तीनशे रेस्टोरंट असून तेथे किमान दहा हजार लोक काम करतात.
मॅकडोनाकडून चीज साठी बारामतीहून दूध मागवले जाते, आलू टिकी मधील बटाटे किंवा लॅट्यूस ही पिकेदेखील स्थानिक शेतकऱ्यांमार्फत खरेदी केली जातात. त्यामुळे आमचा विस्तार झाला की शेतकऱ्यांचाही फायदा वाढेल. बर्गर सारख्या परदेशी पदार्थांबरोबरच आम्ही स्थानिक खाद्यसंस्कृतीलाही आमच्या मेनूमध्ये स्थान दिले आहे. दक्षिण भारतात भाताचे विविध डिश आणल्या असून फ्राईड चिकनबरोबरच आसामी पद्धतीचा मसाला वापरून स्पायसी फ्राईड चिकनही बाजारात आणले आहे.
आम्ही पर्यावरणविषयकही तितकेच सजग असून वापरलेल्या स्वयंपाकाच्या तेलापासून बायोडिझेल तयार केले. त्यामुळे हवेतील कार्बन सुमारे सात ते आठ टनांनी कमी झाला, एक लाख झाडे लावण्यासारखेच हे काम होते. आमच्या पॅकिंगच्या पिशव्या या पुनर्वापरयोग्य असून त्या तयार करतानाही पर्यावरणाची जवळपास नगण्य हानी होते. याबद्दल आम्हाला अत्यंत कठीण असा एफएससी मार्क मिळाला आहे. उर्जाबचत तसेच पाणीबचत करण्यावरही आमचा कटाक्ष असल्याचेही जातिया म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.