आम्ही मराठी सर्वांत भारी; 'स्टार्टअप'मध्ये महाराष्ट्र अव्वल!

आम्ही मराठी सर्वांत भारी; 'स्टार्टअप'मध्ये महाराष्ट्र अव्वल!

नवी दिल्ली:  ‘स्टार्टअप इंडिया’ योजनेंतर्गत गेल्या चार वर्षात देशभरात 19 हजार 351 स्टार्टअप उद्योगांची नोंदणी झाली असून सर्वाधिक 3 हजार 661 स्टार्टअप उद्योगांची नोंदणी एकट्या महाराष्ट्रात झाली आहे.

या योजनेंतर्गत देशातील राज्यांमध्ये स्टार्टअप उद्योगात झालेल्या वैकल्पिक गुंतवणुकीतही महाराष्ट्राने आघाडी घेत देशात दुसरा क्रमांक मिळवला आहे. राज्यात एकूण 68 स्टार्टअप मध्ये 440 कोटी 38 लाखांची वैकल्पिक गुंतवणूक झाली आहे.

केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालयाच्यावतीने 16 जानेवारी 2016 पासून देशभरात ‘स्टार्टअप इंडिया’ योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. एकूण 19 कृती आराखड्यानुसार सुरु असलेल्या या कार्यक्रमावर देखरेख ठेवणा-या केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग व देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयटी) 24 जून 2019 रोजी राज्यनिहाय स्टार्टअप उद्योगांची यादी जाहीर केली आहे. या यादीत देशातील 29 राज्ये आणि 7 केंद्र शासीत प्रदेशांची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून 3 हजार 661 स्टार्टअप उद्योगांसह महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com