दोनशेच्या नोटा अजून स्क्रिनवरच !

सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

दोनशेची नवी .नोट अजूनही पूर्णपणे चलनात आली नसल्याने सोशल मिडियावर विनोदांचा पाऊस पडतो आहे. आरबीआयने दोनशेची नोट चलनात आणून एक महिन्यांहून अधिक काळ उलटला आहे. त्यामुळे ''दोनशेची नोट मिळवण्यासाठी कोणता अर्ज भरावा लागतो का?'' असा प्रश्न उपहासात्मक प्रश्न विचारला जातो आहे.

रिझर्व्ह बँकेने 26 ऑगस्टला दोनशे रुपयांची नवी नोट सादर केली. मात्र महिन्याहून अधिक काळ उलटून गेला तरी अजूनही सर्वसामान्य नागरिकांच्या हाती दोनशेची नोट हाती पडलेली नाही. नागरिकांना आणखी किती महिने वाट पाहावी लागणार आहे अशी सर्वत्र विचारणा सुरू झाली आहे. 

सुरुवातीला एटीएम यंत्रांमध्ये काही तांत्रिक सुधारणा कराव्या लागणार असल्याचे कारण देऊन नागरिकांच्या हातात दोनशेच्या नोटा येण्यासाठी काही काळ जावा देऊ लागणार आहे. मात्र बँकांमध्ये नोट उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. आता मात्र देशातील प्रत्येक बॅंकेच्या शाखेत दोनशेच्या नोटा पोचण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे कारण आरबीआयकडून दिले जात आहे. 

नोटाबंदीतून काहीच धडा घेतला नाही...?

केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा चालनातून बाद केल्यानंतर पाचशे आणि दोन हजार रुपयांची नवीन नोट चलनात आणली होती. मात्र त्यावेळी देखील एटीएम यंत्रांमधून नवीन नोटा मिळवण्यासाठी मशीनमध्ये सुधारणा करावी लागली होती. मात्र त्यानंतर आता देखील केंद्र सरकार आणि आरबीआयने आधीच एटीएम यंत्रात कोणतेही बदल न करताच दोनशेच्या नोटा सादर केल्या. त्यामुळे दोनशेच्या नोटा अजूनही चलनात येऊ शकल्या नाहीत. दरम्यान, काही एटीएम मशीन पुरवणाऱ्या कंपन्यांकडून नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगण्यात आले होते की, एटीएम यंत्रामध्ये सुधारणा करण्यासंदर्भात आरबीआयकडून कोणतीही माहिती अजून मिळाली नाही. मात्र, काही बँकांनी अनौपचारीकरीत्या दोनशेच्या नोटांसाठी बदल करण्याबाबत विचारणा केल्याचे या कंपन्यांनी मान्य केले आहे. तसेच काही ठिकाणी दोनशेच्या नोटा नसल्यामुळे एटीएम मशीनमध्ये सुधारणा झाल्यानंतरची चाचणी घेण्यासाठी नोटाच उपलब्ध नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोनशेच्या नवीन नोटा उपलब्ध झाल्यानंतरच मशीनमध्ये सुधारणा करणे शक्य होणार आहे. 

सोशल मीडियावर चर्चा

दोनशेची नवी .नोट अजूनही पूर्णपणे चलनात आली नसल्याने सोशल मिडियावर विनोदांचा पाऊस पडतो आहे. आरबीआयने दोनशेची नोट चलनात आणून एक महिन्यांहून अधिक काळ उलटला आहे. त्यामुळे ''दोनशेची नोट मिळवण्यासाठी कोणता अर्ज भरावा लागतो का?'' असा प्रश्न उपहासात्मक प्रश्न विचारला जातो आहे.

Web Title: Marathi news finance news in Marathi waiting for Rs 200 note