प्रतितास 80 हजार जीएसटी विवरणपत्रे भरली 

पीटीआय
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली : वस्तू व सेवा कर (जीएसटी) नेटवर्क पोर्टलवर ऑगस्टमध्ये विवरणपत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रतितास 80 हजार जीएसटीआर-3 बी फॉर्म अपलोड करण्यात आल्याची माहिती जीएसटीचे प्रमुख अजय पांडे यांनी दिली.

ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत जीएसटीआर-3बी भरण्यात येत होते, असेही पांडे यांनी या वेळी सांगितले. जीएसटी 1 जुलै 2017 रोजी लागू झाल्यानंतर जीएसटीआर-3 बी भरण्यात आले होते. 

सध्या जीएसटीआर-3बीची व्यवस्था सुरळीत असून, 16 सप्टेंबरपर्यंत साडेतीन लाख करदात्यांनी जीएसटीआर-3बी भरले होते. जुलै महिन्यासाठी 47 लाख जीएसटीआर-3बी भरण्यात आले. 16 सप्टेंबरपर्यंत 95 हजार कोटी रुपयांचे करसंकलन झाल्याचेही पांडे यांनी सांगितले. 

विवरणपत्र भरण्यासाठी वाट पाहू नका : जेटली 
ऑगस्टमध्ये जीएसटी विवरणपत्र भरण्यासाठी 75 टक्के व्यावसायिक शेवटच्या दिवसाची वाट पाहात होते, जीएसटी विवरणपत्र भरण्यासाठी शेवटच्या मिनीटापर्यंतची गर्दी टाळण्याबाबत सजग रहा, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले. जीएसटी नेटवर्क एक तासाला एक लाख विवरणपत्रे भरण्याची क्षमता बाळगते. म्हणजेच दिवसाला 24 लाख विवरणपत्रे एका दिवसामध्ये भरता येऊ शकतात, असेही जेटली म्हणाले.

Web Title: marathi news marathi websites GST news Mumbai news Indian Economy