मार्च अखेरीस 'या' दिवशी बँका बंद! 

वृत्तसंस्था
सोमवार, 19 मार्च 2018

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 29 मार्च रोजी 'भगवान महावीर जयंती'निमित्त सार्वजनिक सुटी आहे. तसेच 30 मार्च रोजी 'गुड फ्रायडे' असल्याने बँकांचे व्यवहार बंद राहणार आहे.

मुंबई: चालू महिन्याच्या (मार्च) शेवटच्या आठवड्यात बँकांना तीन दिवस सुटी आल्याने आर्थिक नियोजन बिघडण्याची शक्यता आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 29 मार्च रोजी 'भगवान महावीर जयंती'निमित्त सार्वजनिक सुटी आहे. तसेच 30 मार्च रोजी 'गुड फ्रायडे' असल्याने बँकांचे व्यवहार बंद राहणार आहे. मात्र 31 मार्च रोजी शनिवार असल्याने बँकांचे व्यवहार सुरू राहणार आहेत. परंतु त्यानंतर 1 एप्रिल रोजी 'ईस्टर संडे'निमित्त बँका बंद राहणार आहेत. मात्र 2 एप्रिलपासून बँका नियमितपणे सुरू राहतील. 

31 मार्चरोजी शनिवारचा दिवसवगळता तीन दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. परिणामी, ग्राहकांचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता असून एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. 

 

Web Title: In March, Banks will be closed for three days

टॅग्स