भांडवली बाजारात मार्चमध्ये दहा हजार कोटींची परदेशी गुंतवणूक

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मार्च 2017

नवी दिल्ली: भारतीय भांडवली बाजारात मार्च महिन्यात गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. चालू महिन्यात (मार्च) परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात रु.10,000 कोटींची गुंतवणूक केली आहे. नुकताच पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळविले आहे. त्यामुळे येत्या काही काळात शेअर बाजारात गुंतवणुकीचा ओघ कायम राहणार आहे.

सरलेल्या महिन्यात या गुंतवणूकदारांमार्फत शेअर बाजारात 15,862 कोटी रुपयांचा ओघ दाखल झाला आहे. या गुंतवणूकदारांकडून आकारण्यात येणाऱ्या करविषयक नियमांचे स्वरुप स्पष्ट झाल्याने गुंतवणूकीचे प्रमाण वाढले आहे. आधी सलग चार महिने गुंतवणूकदारांचा विक्रीचा मारा सुरु होता. ऑक्टोबर-जानेवारी दरम्यान शेअर बाजारातून रु.80 हजार कोटींचा निधी बाहेर पडला होता.
डिपॉझिटरीजने दिलेल्या माहितीनुसार, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 1 ते 10 मार्चदरम्यान 9,628 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून रोखे बाजारात 660 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अशाप्रकारे, गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात एकुण 10,288 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

Web Title: March FPI inflows at Rs 10,000 cr