मारुती सुझुकी पुन्हा सुसाट

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

मुंबई: ऑटोमोबाइल क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने चौथ्या तिमाहीत 1,882 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत  कंपनीने 1,710.5 कोटी रुपयांचा नफा मिळविला होता. त्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. चौथ्या तिमाहीत मारुतीचे उत्पन्न 15.4 टक्क्यांनी वाढून 21,165.6 कोटींवर पोचले आहे. जे गेल्यावर्षी याच तिमाहीत 18,333.4 कोटी रुपये होते. 

आज (शुक्रवार) मुंबई शेअर बाजारात इंट्राडे व्यवहारात मारुती सुझुकीच्या शेअरमध्ये 1.86 टक्क्यांची घसरण झाली आहे. तो सध्या 8780.95 रुपयांवर व्यवहार करतो आहे. सरलेल्या तिमाहीती मारुतीच्या शेअरने 10000 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे 265,463.43 कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.

Web Title: Maruti Q4 net profit up mere 10 percent at Rs 1,882 cr