ऑटोमोबाईलमध्ये मंदी: मारुती सुझुकीला फटका

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 जुलै 2019

मुंबई: देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने एप्रिल ते जून या तिमाहीत 1,435 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. मारुती सुझुकीच्या नफ्यात 27.3 टक्क्यांची घसरण झाली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीचे चित्र मारुतीच्या कामगिरीत स्पष्टपणे दिसते आहे. कंपनीच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. कंपनीने 18,735.2 कोटी रुपये मूल्याच्या वाहनांची विक्री केली आहे. गेल्यावर्षीच्या याच कालावधीशी तुलना करता मारुतीच्या विक्रीत 14.1 टक्क्यांची घट झाली आहे. मारुती सुझुकीने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 4 लाख 2 हजार 594 वाहनांची विक्री केली आहे. 

गेल्या वर्षाशी तुलना करता कंपनीच्या वाहनविक्रीत 17.9 टक्क्यांची घट झाली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कंपनीने 3 लाख 74 हजार 481 वाहनांची विक्री केली आहे तर 28 हजार 113 वाहनांची निर्यात केली आहे. मारुती सुझुकीचा शेअर सध्या राष्ट्रीय शेअर बाजारात 5,820.00 रुपये प्रति शेअर या पातळीवर व्यवहार करतो आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maruti Suzuki Q1 profit declines 27.3% to Rs 1435 cr