esakal | महागाईच्या आघाडीवर सरकारला झटका; 'मे' महिन्यातील दर वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

महागाईच्या आघाडीवर सरकारला झटका; 'मे' महिन्यातील दर वाचा

मे महिन्यात घाऊक महागाईच्या आघाडीवर सरकारला मोठा झटका बसला आहे. मे महिन्यातील घाऊक महागाईचे दर आता समोर आले आहेत.

महागाईच्या आघाडीवर सरकारला झटका; 'मे' महिन्यातील दर वाचा

sakal_logo
By
सूरज यादव

मे महिन्यात घाऊक महागाईच्या आघाडीवर सरकारला मोठा झटका बसला आहे. मे महिन्यातील घाऊक महागाईचे दर आता समोर आले आहेत. यामध्ये एप्रिलमधील 10.49 टक्क्यांवरील महागाईचे आकडे मे महिन्यात थेट 12.94 टक्क्यांवर गेलेले पाहायला मिळतायत. मासिक आधारावर तुलना केल्यास मार्चमधील सुधारित WPI 7.39 टक्क्यांवरून 7.89 टक्क्यांवर गेला आहे.

मे महिन्याच्या अखेरीस, घाऊक बाजारात एप्रिलमधील 7.58 टक्के महागाई 8.11 टक्क्यांवर गेली आहे. त्याचबरोबर इंधन आणि विजेच्या महागाई आकड्यांमध्ये देखील वाढ झाली आहे. मार्चमध्ये 20.94 टक्क्यांवर असलेले महागाईचे आकडे आता 37.61 टक्क्यांवर पोहोचले आहेत.

डाळीच्या महागाई आकडयांमध्ये देखील मे महिन्यात वाढ झालेली पाहायला मिळतेय. डाळीच्या महागाईचे आकडे एप्रिलमध्ये 10.74 टक्क्यांवर होते जे की मे मध्ये 12.09 टक्क्यांवर गेलेले पाहायला मिळतायत. त्याचबरोबर कांद्याचे महागाई दर एप्रिल महिन्यात -19.72 टक्क्यांच्या तुलनेत मे मध्ये 23.24 टक्क्यांवर गेले आहेत.

हेही वाचा: 'अदानी'च्या शेअर होल्डर्ससाठी 'काळा सोमवार'; सर्व कंपन्यांचे शेअर्स कोसळले

बटाट्याचा घाऊक महागाईचा दर मार्चमधील -30.44 टक्क्यांच्या तुलनेत मे महिन्यात -27.9 टक्के इतका झाला आहे. तर उत्पादित उत्पादनांचा (Manufactured Products) चा घाऊक महागाई दर एप्रिलच्या 9.01 टक्क्यांवरून मे मध्ये 10.83 टक्क्यांवर गेला आहे.

प्राथमिक वस्तूंची (Primary Articles) घाऊक महागाई एप्रिलमधील 10.16 टक्क्यांवरून घसरून 9.61 टक्क्यांवर आली आहे. त्याचबरोबर भाजीपाल्याची घाऊक महागाई एप्रिलमध्ये -9.03 टक्क्यांच्या तुलनेत -9 टक्क्यांवर आली आहे. तर दुधाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, महागाई आकडे एप्रिलमधील 2.04 टक्क्यांवरून वाढून मे महिन्यात 2.51 टक्क्यांवर गेलेले पाहायला मिळतायत. त्याचबरोबर अंडी, मांस, मासे यांचे आकडे साधारण तेवढेच म्हणजे 10.88 टक्क्यांच्या तुलनेत मे मध्ये 10.73 टक्के राहिलेत

loading image