मॅकडोनाल्डची साखळी आणखी विस्तारणार 

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

चेन्नई : देशभरात मॅकडोनाल्ड रेस्टॉरन्टची साखळी चालविणाऱ्या हार्डकॅसल रेस्टॉरन्ट्‌स कंपनीने व्यवसाय विस्तारासाठी पुढील पाच ते सात वर्षांत सातशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. 

चेन्नई : देशभरात मॅकडोनाल्ड रेस्टॉरन्टची साखळी चालविणाऱ्या हार्डकॅसल रेस्टॉरन्ट्‌स कंपनीने व्यवसाय विस्तारासाठी पुढील पाच ते सात वर्षांत सातशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. 

ही कंपनी मॅकडोनाल्ड रेस्टॉरन्टमध्ये मॅक कॅफेही चालविते. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका स्मिता जातिया म्हणाल्या, ""मॅकडोनाल्ड रेस्टॉरन्ट आणि मॅक कॅफेंचा विस्तार करण्यासाठी कंपनी सातशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मॅक कॅफे सुरवातीला मुंबईमध्ये सुरू करण्यात आले. याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता ते चेन्नईमध्येही सुरू करण्यात आले आहेत. पश्‍चिम आणि दक्षिण विभागात मॅक कॅफे सुरू आहेत. कंपनीने तीन वर्षांत बारा शहरांतील 95 रेस्टॉरन्टमध्ये मॅक कॅफे सुरू केले आहेत.'' 

Web Title: mcdonald chain to expand