Meta Shares : झुकरबर्गच्या मेटा कंपनीला धक्का! गुंतवणुकदार चिंतेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mark zuckerberg

Meta Shares : झुकरबर्गच्या मेटा कंपनीला धक्का! गुंतवणुकदार चिंतेत

मेटा आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्गसाठी (Mark Zuckerberg) हे वर्ष अत्यंत वाईट ठरत असून, 2022 हे वर्ष त्यांच्या संपत्तीत घट करणारे ठरत आहे. काल मेटाच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण झाली आहे. 2016 नंतर मेटाच्या शेअर्सची सर्वात कमी किंमतझाली आहे. आठवड्यातील कंपनीच्या खराब त्रैमासिक निकालांमुळे, मेटा शेअर्समध्ये (Shares) प्रचंड घसरण झाली आहे. यूएस स्टॉक मार्केटमध्ये 25 टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवण्यात आली आहे. गुरुवारी, मेटाचा एक शेअर $100 च्या खाली गेला, त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

हेही वाचा: Post Office Scheme : फक्त 299 रुपयांच्या गुंतवणुकीत मिळणार 10 लाखांचा फायदा

मेटाचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला मेटाव्हर्स मोठ्या गुंतवणुकीसह सुरू केला, परंतु त्याचे विपरीत परिणाम दिसत आहेत. अलीकडच्या तिमाही निकालांमध्ये, कंपनीचा नफा आणि कमाई दोन्हींमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे काल मेटाच्या शेअर्समध्ये 25 टक्क्यांपर्यंत जोरदार घसरण झाली.

मेटाच्या घसरलेल्या शेअरमुळे कंपनी आता अमेरिकेतील टॉप 20 सर्वात श्रीमंत कंपन्यांच्या यादीतून बाहेर आहे. हा कंपनीसाठी आणि गुंतवणुकदारांसाठी मोठा धक्का आहे. गेल्या वर्षी कंपनी अमेरिकेतील टॉप 5 श्रीमंत कंपन्यांच्या यादीमध्ये होती. कंपनीचे भांडवल 1 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त होते. आता कंपनीचे भांडवल $ 270 बिलियनवर आले आहे. त्यामुळे कंपनी टॉप 20 श्रीमंत कंपन्यांच्या यादीतून बाहेर आहे.

हेही वाचा: BYJU'S कंपनी अडचणीत? ‘ही’ आहेत कारणे

मार्क झुकेरबर्गच्या संपत्तीतही मोठी घट

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांच्या संपत्तीतही मोठी घट झाली असून ते जगातील टॉप 20 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. सध्या, मार्क झुकेरबर्ग जगातील 23 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. जे एकेकाळी टॉप 3 मध्ये होते.