आली रे आली आता MG Hector आली... 

आली रे आली आता MG Hector आली... 

नवी दिल्ली: भारतात बहुप्रतीक्षित ‘एमजी मोटर’च्या MG Hector चे आगमन झाले आहे.  पहिली इंटरनेट कार म्हणून बिरुद मिळवणारी 'एमजी हेक्टर' भारतात सादर करण्यात आली आहे. इंटरनेट कनेक्टीविटी हे या गाडीचे खास वैशिष्ट सांगता येईल. शिवाय गाडीत आयस्मार्ट तंत्रज्ञान वापरण्यात आले असून गाडीतील 10.4 टचस्क्रिन ही सुरक्षित, कनेक्टेड प्रवासाची खात्री देते. एसयूव्ही प्रकारातील हेक्टर इतर एसयूव्हीच्या तुलनेत फारच उजवी ठरणार आहे. 

कशी आहे हेक्टर? 
हेक्टर 4655 एमएम लांब असून, रुंदी 1835 एमएम आणि उंची 1760 एमएम आहे. बाजारातील इतर एसयूव्हीच्या तुलनेत हेक्टर ही उंची, रुंदीने मोठी असून हेक्टरचा व्हिलबेस देखील मोठा आहे. आकाराने मोठय़ा असलेल्या या गाडीची चाक 17 इंचांची आहेत. टाटाच्या हॅरियरप्रमाणे हेड लाइटची रचना  करण्यात आली असून गाडीत डायन्यामिक टर्न इंडिकेटर्स आहेत. पांढऱ्या एलईडी क्वाड प्रोजेक्टर हेडलाइट देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे फॉग लाइट म्हणून एलईडी देण्यात आले आहेत.

हेक्टर व्हर्जन: 
> हेक्टर पेट्रोल व्हर्जनला 1.5 लिटर टर्बो-चार्ज पेट्रोल इंजिनची देण्यात आले आहे. ज्यात 250 एनएमच्या पीक टॉर्कवर 143 पीएस शक्ती उत्पन्न करण्याची क्षमता आहे. हे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रांसमिशन अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहे. 

> हेक्टरचे डिझेल व्हर्जनला 2.0 लिटर डिझेल इंजिन 350 एनएमच्या पीक टॉर्कवर 170 पीएस प्रदान करेल व सोबतच श्रेणीमधील सर्वोत्तम इंधन कार्यक्षमताही प्रदान करेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. 48 व्होल्ट लिथियम-या गाडीत ‘48 व्ही’ हायब्रीड प्रणाली वापरली आहे . उत्सर्जन कमी करण्यासोबतच इंधन-कार्यक्षमता वाढण्यासाठी बनवलेले हे युनिट 20 एनएमपर्यंत अतिरिक्त टॉर्क सहाय्य प्रदान करण्यास ऊर्जेचा संग्रह करते. शिवाय  6-स्पीड डीसीटी- डीसीटी हे ऑटोमॅटिक ट्रांसमिशन आहे. 

गाडीत दोन ऐअरबॅग, एबीएस, इबीडी, चिल्ड्रन सीट ठेवण्यासाठी विशेष सुविधा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम, ट्रक्शन कंट्रोल अशा विविध सुविधा आहेत.  गाडीच्या सर्व पर्यायांमध्ये या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र टॉप मॉडेलमध्ये महागडय़ा पर्यायांमध्ये कर्टन एअरबॅगसह सहा एअरबॅग देण्यात आल्या आहेत. टायरमधील हवेचा दाब पाहण्यासाठी टायर प्रेशर मॉनिटर देण्यात आला आहे. 

आय स्मार्ट यंत्रणा हे हेक्टरचे वैशिष्टय असून हेक्टरमध्ये 10.4 इंचांची टचस्क्रीन देण्यात आली आहे. ही टचस्क्रीन गाडीच्या कमांड सेंटरप्रमाणे काम करते. या टचस्क्रीनद्वारे तुम्ही गाडी नियंत्रित करू शकता. ‘हॅलो एमजी’ असे बोलल्यानंतर गाडी तुमच्या आज्ञेचे पालन करते. यामध्ये  सनरूफ, एसी असे विविध पर्याय या माध्यमातून ऑपरेट करता येतात. खास भारतीय रस्ते, हवामान आणि भारतीय चालक यांचा अभयास करून गाडीचे फीचर्स तयार करण्यात आले आहेत. 

टाटाची हॅरियर, Hyundai टक्सन आणि महिंद्रा XUV500 यांसारख्या गांड्यांसोबत हेक्टरची थेट स्पर्धा असणार आहे. हेक्टरचे पहिले बेसिक मॉडेल 12 लाखात तर टॉप मॉडेल 16.88 लाखांपर्यंत मिळणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com