खनिज तेल आयातीचा उच्चांक

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली - ऑक्‍टोबर महिन्यात खनिज तेलाच्या आयातीमध्ये लक्षणीयरीत्या वाढ झाल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. गेल्या महिन्यात आयातीमध्ये १०.५ टक्‍क्‍यांची वाढ नोंदविली गेली असून, हा गेल्या सात वर्षांतील उच्चांक ठरला आहे. 

मंत्रालयाच्या पेट्रोलियम प्लॅनिंग आणि ॲनालिसिस सेलने (पीपीएसी) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्‍टोबर महिन्यात खनिज तेलाची आयात १०.५ टक्‍क्‍यांनी वाढून २.१२ कोटी टन झाली. अनेक तेल शुद्धीकरण प्रकल्पांनी युनिटच्या दुरुस्तीनंतर खरेदीला दिलेले प्राधान्यआयातवाढीचे ठरले. आफ्रिकेतून होणाऱ्या आयातीत गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत ऑक्‍टोबरमध्ये मोठी वाढ झाली. याबरोबरच पेट्रोलियम उत्पादनांची आयात २० टक्‍क्‍यांनी, तर निर्यात ४ टक्‍क्‍यांनी घटल्याचे ‘पीपीएसी’च्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mineral oil import Increase