खूशखबर! केंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला, वाचा सविस्तर

Money for wife
Money for wifeesakal

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचे वेतन पूर्व-सुधारित वेतनश्रेणीत काढण्यासाठी केंद्राने महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या भत्त्यात वाढ होऊन ही आकडेवाडी 368 टक्क्यांवरून 381 पर्यंत जाणार आहे. (Center government increases dearness allowance to center employees)

केंद्र सरकारचे कर्मचारी पाचवा आणि सहाव्या वेतन आयोगाच्या (CPC) पूर्व सुधारित वेतनश्रेणी किंवा ग्रेड पेमध्ये या कर्मचाऱ्यांचे वेतन काढणार आहे. त्यासाठी महागाई भत्ता (DA) वाढवण्याचा निर्णय झालाय. याआधी रेल्वेसह केंद्रातील अन्य काही खात्यांमध्ये सातवा वेतन आयोगानुसार अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. मात्र, यंदा केंद्र सरकारने केंद्रीय स्वायत्त संस्थांमध्ये काम करणाऱ्या सरकारी नोकर आणि कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा केली आहे.

केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचे वेतन पूर्व-सुधारित वेतनश्रेणी किंवा पाचव्या CPC च्या ग्रेड पेमध्ये काढले जात आहे. केंद्राने या भत्त्याची किंमत सध्याच्या 368 टक्क्यांवरून 381 टक्क्यांवर नेली आहे. तर केंद्र सरकारच्या अन्य कर्मचार्‍यांचे वेतन पूर्व-सुधारित सहाव्या CPC वेतनश्रेणी किंवा ग्रेड पेनुसार काढण्यात येणार असल्याची महिती समोर आली आहे. केंद्राने त्यांचा डिअरनेस अलाऊंस 196 टक्क्यांवरून 203 टक्के केला आहे.

या नव्या वाढीची अंमलबजावणी 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल, अशी माहिती वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाकडून जारी करण्यात आली होती. अखेर हे प्रकरण मार्गी लागलं आहे. त्यामुळे लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. अर्थ खात्याने यासंबंधी परिपत्रक काढलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com