esakal | RBI MPC: मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीतील 10 ठळक मुद्दे
sakal

बोलून बातमी शोधा

RBI MPC

आज RBIने मैद्रिक धोरण समितीच्या बैठकीनंतर नवीन पतधोरणे जाहीर केली

RBI MPC: मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीतील 10 ठळक मुद्दे

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: आज RBIने मैद्रिक धोरण समितीच्या बैठकीनंतर नवीन पतधोरणे जाहीर केली. आरबीआयने व्याजदरात कोणताही बदल केलेला नसून सलग तिसऱ्यांदा प्रमुख पतधोरण दर रेपो रेट 4 टक्के ठेवला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या (MPC) बैठकीत रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला. रेपो रेट कमी केला तर त्याचा थेट परिणाम गृहकर्ज, कार लोन, शैक्षणिक कर्जाच्या ईएमआयवर होत असतो. 

चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था 7.5 टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला आहे. दास म्हणाले की, वित्तीय व्यवस्थेतील ठेवीदारांचे हित जपण्यासाठी रिझर्व्ह बँक कटिबद्ध आहे आणि वित्तीय बाजार नियोजनबद्ध पद्धतीने काम करत आहेत. व्यावसायिक बँका 2019-20 साठी लाभांश देणार नाहीत.

रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या (एमपीसी) बैठकीतील ठळक मुद्दे-
- रेट रेपो ४ टक्के ठेवला आहे. तर रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के.

- व्यावसायिक आणि सहकारी बँका 2019-20 चा नफा स्वतःकडे ठेवतील तर आर्थिक वर्षासाठी कोणताही लाभांश देणार नाहीत.

-मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या सर्व सदस्यांनी महागाईची उच्च पातळी लक्षात घेता धोरणात्मक दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला.

Gold Silver Price: नोव्हेंबरमध्ये सोने 2500 रुपयांनी स्वस्त; माहिती करून घ्या आजचे दर

-चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत आर्थिक पुनरुज्जीवनाची लक्षणे दिसली. चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था 7.5 टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज. 

-आरटीजीएस प्रणाली काही दिवसांत आठवड्यातून 24 तास काम करेल. 

-कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आधारित महागाई तिसऱ्या तिमाहीमध्ये 6.8 टक्के, तर चौथ्या तिमाहीत 5.8 टक्के राहण्याचा अंदाज.

-वित्तीय व्यवस्थेतील ठेवीदारांचे हित जपण्यासाठी रिझर्व्ह बँक कटिबद्ध असणार, शक्तीकांत दास यांचा विश्वास.

-अर्थव्यवस्थेत झपाट्याने सुधारणा होत आहे आणि नवी क्षेत्रेही सुधारणेच्या मार्गावर येत आहेत

- वित्तीय बाजार नियोजनबद्ध पद्धतीने काम करत आहेत.

-जीडीपीमधील वाढ तिसऱ्या तिमाहीत 0.1 टक्के तर चौथ्या तिमाहीत 0.7 टक्के वाढण्याचा अंदाज. 

(edited by- pramod sarawale)