
2020च्या ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56 हजार 200 पर्यंत गेले होते, त्यानंतर सोन्याचे भाव घसरत गेले
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारातील घडोमोडींना आता वेग आल्याने भारतीय कमॉडिटी मार्केटवर त्याचा मोठा परिणाम दिसत आहे. एमसीएक्समध्ये फेब्रुवारी महिन्यातील सोन्याचे दर 0.3 टक्क्यांनी वाढून 48 हजार 70 रुपये प्रति १० ग्रॅम झाले, तर चांदीचे दर 1.2 टक्क्यांनी वाढून 60 हजार 977 रुपये प्रति किलो झाले आहे. मागील सत्रात सोन्याचे दर 0.4 टक्क्यांनी तर चांदीचे दर 0.2 टक्क्यांनी घसरले होते.
2020च्या ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56 हजार 200 पर्यंत गेले होते, त्यानंतर सोन्याचे भाव घसरत गेले आहेत. चांदीही प्रतिकिलो जवळपास 79 हजारांच्या जवळ गेली होती. त्यानंतर चांदीतही मोठी घट होत असल्याचे दिसत आहे. फक्त नोव्हेंबर महिन्याच्या आकडेवारी पाहिली तर सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमला सुमारे 2500 रुपयांनी स्वस्त झाले आहेत.
Signs of economic revival: क्रेडिट कार्डच्या मागणीत होतेय वाढ
डॉलरमध्ये घसरण-
आंतरराष्ट्रीय बाजारात आज डॉलर कमकुवत झाल्यामुळे सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. सोने 0.1 टक्क्यांनी वाढून 1778.76 डॉलर प्रति औंस झाले. दुसरीकडे डॉलरचा निर्देशांक 0.05 टक्क्यांनी घसरला त्यामुळे इतर चलनधारकांसाठी सोने स्वस्त झालं आहे.
भारत सोन्याचा दुसरा सर्वात मोठा आयातदार-
भारतात 2020मध्ये सोन्याची आयात वाढून ऑगस्टमध्ये 3.7 अब्ज डॉलर झाली आहे, जी मागील वर्षी याच महिन्यात 1.36 अब्ज डॉलरची होती. चीननंतर भारत सोन्याचा दुसरा सर्वात मोठा आयातदार आहे. भारतात सोन्यावर 12.5 टक्के आयात शुल्क आणि 3 टक्के जीएसटी लागतो.
Covid 19 Impact: पुढील वर्षात 10 टक्क्यापर्यंत वाढणार NPA; रेटिंग एजन्सीचा अंदाज
भारताकडील सोन्याचा साठा-
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (World Gold Council) अहवालानुसार भारतात सध्या 653 मेट्रिक टन सोने आहे. यामुळे सर्वाधिक गोल्ड रिझर्व्हच्या बाबतीत भारत जगात नवव्या क्रमांकावर आहे.
(edited by- pramod sarawale)