PMC Bank : 6500 कोटींहून अधिक गैरव्यवहार!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी बँक) गैरव्यवहार प्रकरणात बँकेच्या अंतर्गत चौकशी समितीने मोठी माहिती दिली आहे. यामध्ये बँकेच्या रेकॉर्डमधून एकूण 10.5 कोटींची रक्कम गायब झाल्याचे समितीने सांगितले आहे.

मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी बँक) गैरव्यवहार प्रकरणात बँकेच्या अंतर्गत चौकशी समितीने मोठी माहिती दिली आहे. यामध्ये बँकेच्या रेकॉर्डमधून एकूण 10.5 कोटींची रक्कम गायब झाल्याचे समितीने सांगितले आहे. बँकेत झालेला गैरव्यवहार हा 4355 कोटी रुपयांचा नसून, 6500 कोटींहून अधिक असल्याचेही समोर आले आहे.

पीएमसी बँकेच्या अंतर्गत चौकशी समितीला जे चेक मिळाले आहे. ते 10 कोटींहून अधिक रकमेचे आहेत. इतर 50-55 लाख रुपयांच्या रकमेसंदर्भात माहिती नाही. तसेच हा गैरव्यवहार समोर आल्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी सुरवातीला 4355 रुपयांचा झाल्याचे सांगितले होते. मात्र, आता या गैरव्यवहार आकडा वाढला असून, 6500 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय बँकेच्या रेकॉर्डवरून 10.5 कोटी रुपये गायब झाल्याचे सांगितले जात आहे. 

आत्तापर्यंत तिघांचा मृत्यू

पीएमसी बँक गैरव्यवहार समोर आल्यानंतर आत्तापर्यंत तिघांचा मृत्यू झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More than 6500 Crores Scam in PMC Banks