भारताच्या मायक्रोफायनान्सच्या जननी विजयालक्ष्मी दास कालवश

वृत्तसंस्था
Monday, 10 February 2020

भारतात मायक्रोफायनान्सची मुळे रुजवण्यात त्यांना महत्त्वाचा वाटा होता. एसकेएस मायक्रोफायनान्स (सध्याचे भारत फायनान्शियल सर्व्हिसेस), स्पंदना किंवा मायक्रोफिन या सर्वच सेवांच्या बाबतीत विजयालक्ष्मी यांचे नाव प्रामुख्याने पुढे येते.

भारतीय मायक्रोफायनान्सच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या विजयालक्ष्मी दास यांचे निधन झाले आहे. त्या 67 वर्षांच्या होत्या. भारतात मायक्रोफायनान्सची मुळे रुजवण्यात त्यांना महत्त्वाचा वाटा होता. एसकेएस मायक्रोफायनान्स (सध्याचे भारत फायनान्शियल सर्व्हिसेस), स्पंदना किंवा मायक्रोफिन या सर्वच सेवांच्या बाबतीत विजयालक्ष्मी यांचे नाव प्रामुख्याने पुढे येते. त्यांच्या भरीव कामगिरीमुळेच त्यांना भारताच्या मायक्रोफायनान्सच्या जननी असे संबोधण्यात येते. अलीकडेच एका प्रथितयश मासिकाने त्यांचा समावेश सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत केला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारताच्या मायक्रोफायनान्सच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल दास यांचा उल्लेख नेहमीच आदराने केला जाईल. फ्रेन्ड्स ऑफ वुमन्स वर्ल्ड बॅंकिंग, इंडियाच्या (एफडब्ल्यूडब्ल्यूबी) त्या संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. त्यांच्या कारकिर्दीत अहमदाबाद, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकातील 200 पेक्षा अधिक अल्पकर्ज वितरण करणाऱ्या संस्थांना पतपुरवठा करणारी पहिली कर्जवितरण वितरण संस्था बनणयाचा मान एफडब्ल्यूडब्ल्यूबीला मिळाला होता.

एफडब्ल्यूडब्ल्यूबी इंडिया ही महिलांच्या जागतिक बॅंकिंग नेटवर्कचा एक भाग आहे. या संस्थेद्वारे महिलांना आर्थिक सेवा पुरवल्या जातात. विजयालक्ष्मी दास यांनी अर्थशास्त्रातून पदवी घेतलेली होती. त्याशिवाय त्यांनी हार्वर्ड इन्स्टिट्युट फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटच्या इकॉनॉमिक इन्स्टिट्युटमधून अर्थशास्त्रातून अॅडव्हान्स कोर्सेसदेखील केलेले होते. त्या अमेरिकेतील वुमन्स वर्ल्ड बॅंकिंगच्या असंख्य संस्थांच्या संचालक मंडळावरदेखील होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother of micro finance Vijayalaxmi Das passed away