जिओच्या ग्राहकांना आता 31 मार्चपर्यंत डेटा फ्री

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

नरेंद्र मोदींच्या पाचशे व हजारांच्या नोटांवरील बंदीचे कौतुक करीत हा अत्यंत धाडसी निर्णय असल्याचे अंबानी म्हणाले. नागरिकांनी मोठ्या मनाने हा निर्णय स्वीकारल्याबद्दल त्यांचेही आभार अंबानी यांनी व्यक्त केले. 

नवी दिल्ली - रिलायन्स जियोने आपल्या जुन्या आणि नव्या ग्राहकांना 31 मार्च 2017 इंटरनेट डेटा मोफत देण्याची घोषणा केली आहे. कंपनीतर्फे नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर "हॅप्पी न्यू इयर' योजनेअंतर्गत जुन्या आणि नव्या ग्राहकांना 31 मार्चपर्यंत अनलिमिटेड डेटा, कॉल, व्हिडीओ सेवा पूर्णपणे मोफत देण्यात येईल, असे रिलायन्स समुहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी सांगितले. 

आता अनेकांना आपला दुसऱ्या नेटवर्कवरील क्रमांक जियोवर पोर्ट करता येणार आहे. त्याचप्रमाणे, ग्राहकांच्या सोयीसाठी त्यांना आता सिम कार्डची होम डिलीव्हरीदेखील दिली जाईल. याआधी 4 डिसेंबरनंतर जियोचे सिमकार्ड खरेदी करणाऱ्यांना मोफत सेवा मिळू शकणार नसल्याचे आदेश ट्रायकडून प्रसिद्ध करण्यात आले होते. 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाचशे व हजारांच्या नोटांवरील बंदीचे कौतुक करीत हा अत्यंत धाडसी निर्णय असल्याचे अंबानी म्हणाले. नागरिकांनी मोठ्या मनाने हा निर्णय स्वीकारल्याबद्दल त्यांचेही आभार अंबानी यांनी व्यक्त केले. 

आगमनापासून सर्व ग्राहकांनी कंपनीला भरभरुन प्रेम दिले असून कंपनीच्या एकुण कामगिरीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली आहे. परंतु प्रतिस्पर्ध्यांनी मात्र साह्य केले नाही असे ते म्हणाले. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत रिलायन्स जियोच्या नेटवर्कवरुन दुसऱ्या नेटवर्कवर करण्यात आलेले 900 कोटी फोन कॉल्स ब्लॉक करण्यात आल्याचा आरोप अंबानी यांनी केला आहे.

Web Title: Mukesh Ambani Announces Reliance Jio Happy New Year Offer