
अंबानी यांच्या संपत्तीत एका दिवसात 5.6 अब्ज डॉलरची घसरण झाली आहे. आता चीनच्या अलीबाबा कंपनीचे सर्वेसर्वा जॅक मा आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहे.
मुंबई : जागतिक पातळीवर पसरत चाललेल्या कोरोनाचा फटका रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना देखील बसला आहे. जागतिक पातळीवरील मंदीमुळे अंबानींच्या संपत्तीत सुमारे 44 हजार कोटी रूपयांची घसरण झाली आहे. फोर्ब्स रिअल टाईमने दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 11.68 टक्क्यांची घट झाली असून ती आता 42.2 अब्ज डॉलवर पोचली आहे. परिणामी आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असण्याचा मान गमवावा लागला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचे येस बँकेला पत्र, म्हणाले...
अंबानी यांच्या संपत्तीत एका दिवसात 5.6 अब्ज डॉलरची घसरण झाली आहे. आता चीनच्या अलीबाबा कंपनीचे सर्वेसर्वा जॅक मा आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्यानंतर सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची घसरण झाली. तो 156 रुपयांच्या घसरणीसह 1113 रुपयांवर व्यवहार करत स्थिरावला. घसरलेल्या कच्च्या तेलाच्या किंमतीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीचा परिणाम जीआरएमवर होण्याची शक्यता आहे. डिसेंबर तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा जीआरएम 9.2 डॉलर प्रतिबॅरल होता. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे बाजारभांडवल 7 लाख 05 हजार 655 कोटींवर पोचले आहे