
बाटलीबंद पाणी आणि व्हॅक्सिन तयार करणाऱ्या चिनी कंपनीचे मालक जुंग शानशान हे मुकेश अंबानी यांना मागे टाकून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
नवी दिल्ली - रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते पण आता त्यांना मागे टाकून जुंग शानशान हे पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. अंबानी आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नाहीत आणि त्यासोबतच जगातील टॉप 10 अब्जाधींशांच्या यादीतही त्यांचे नाव नाही.
बाटलीबंद पाणी आणि व्हॅक्सिन तयार करणाऱ्या चिनी कंपनीचे मालक जुंग शानशान हे मुकेश अंबानी यांना मागे टाकून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाइम बिलेनिअर रँकिंगमध्ये जुंग शानशान जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत सहाव्या नंबरवर पोहोचले आहेत. तर अंबानींची 12 व्या स्थानी घसरण झाली आहे.
हे वाचा - दोन सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेची कारवाई
याआधी ते दहाव्या स्थानावर होते. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत एलन मस्क दुसऱ्या स्थानावर असून अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस हे पहिल्या स्थानी आहेत. जगातील वेगवेगळ्या भागातील शेअर बाजार उघडल्यानंतर दर पाच मिनिटांनी फोर्ब्सच्या रिअल टाइम बिलेनिअर रँकिंगमध्ये बदल होतो. ज्या व्यक्तींची संपत्ती खासगी कंपनींशी संबधित आहे त्यांची एकूण संपत्ती दिवसातून एकदा अपडेट होते.
हे वाचा - शेअर निर्देशांकाची पुन्हा उच्चांकी झेप
मुकेश अंबानी यांना हा गेल्या आठवड्याभरात दुसरा धक्का आहे. याआधी ते जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर झाले आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून जुंग शानशान यांनी बाजी मारली. जानेवारीतच ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते.