शेअर निर्देशांकाची पुन्हा उच्चांकी झेप

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 January 2021

अमेरिकेतील प्रतिकूल वातावरणाकडे दुर्लक्ष करून आज भारतीय शेअर बाजार निर्देशांकाने पुन्हा नवा सर्वकालिक उच्चांक नोंदवला. २१ डिसेंबरच्या मोठ्या पडझडीनंतर निफ्टीने सलग दहाव्या सत्रात वाढ नोंदवली आहे.

मुंबई - अमेरिकेतील प्रतिकूल वातावरणाकडे दुर्लक्ष करून आज भारतीय शेअर बाजार निर्देशांकाने पुन्हा नवा सर्वकालिक उच्चांक नोंदवला. २१ डिसेंबरच्या मोठ्या पडझडीनंतर निफ्टीने सलग दहाव्या सत्रात वाढ नोंदवली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कशाही प्रकारे सत्ता टिकवून धरण्याचे प्रयत्न उघड झाल्याने काल (ता. ४) अमेरिकी शेअर बाजारात पडझड झाली होती. त्यामुळे आज भारतीय बाजार सकाळी उघडताना घसरला. सेन्सेक्‍सही ४८ हजारांच्या खाली घसरला होता; मात्र नंतर तो सावरला व कालच्यापेक्षा २६० अंशांनी वाढून दिवसअखेर ४८,४३७ अंशांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ६६ अंशांनी वाढून १४,१९९ अंशांवर बंद झाला.

फास्टटॅग डिजिटल सिस्टीम होतीय लोकप्रिय; महिन्यात वाढले 1.35 कोटी व्यवहार

आज सेन्सेक्‍समधील प्रमुख ३० समभागांपैकी १६ वधारले तर १४ घसरले. ॲक्‍सिस बॅंक सहा टक्के वाढून ६६४ रुपयांवर बंद झाला. एचडीएफसी, इंडस्‌इंड बॅंक, टीसीएस, एशियन पेंट्‌स यांचे दरही वाढले. ओएनजीसी, बजाज फायनान्स, एसटीपीसी, महिंद्र आणि महिंद्र, रिलायन्स यांचे दर घसरले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stock index jumped again