मुकेश अंबानींनी वाढवला रिलायन्स इंडस्ट्रिजमधील आपला हिस्सा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 September 2019

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधील आपला प्रमोटर हिस्सा वाढला आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्समधील आपला हिस्सा 2.71 टक्क्यांनी वाढवून 48.87 टक्क्यांवर नेला आहे.

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधील आपला प्रमोटर हिस्सा वाढला आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्समधील आपला हिस्सा 2.71 टक्क्यांनी वाढवून 48.87 टक्क्यांवर नेला आहे.

रिलायन्स सर्व्हिसेस आणि होल्डिंग लि.ने रिलायन्स इंडस्ट्रीजचे 17.18 कोटी शेअर म्हणजेच 2.71 हिस्सा 13 सप्टेंबरला विकत घेतले आहेत. जूनअखेर अंबानी आणि त्यांच्या खासगी कंपनीचा रिलायन्समधील हिस्सा 47.29 टक्के इतका होता. तर परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा 24.4 टक्के, म्युच्युअल फंडांचा 4.56 टक्के आणि विमा कंपन्यांचा रिलायन्समध्ये 7.1 टक्के हिस्सा आहे. ही आकडेवारी 30 जूनअखेरीची आहे.

कॉग्निझंट बनली दोन लाख कर्मचारी असणारी दुसरी आयटी कंपनी

रिलायन्स इंडस्ट्रीजचे उर्वरित शेअर सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडे आहेत. जुलैमध्ये रिलायन्सने रिलायन्स होल्डिंग युएसएचे रिलायन्स एनर्जी जनरेशन अॅंड डिस्ट्रीब्युशनमध्ये विलीनीकरण केले होते. आज दिवसअखेर राष्ट्रीय शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 1209.00 रुपये प्रति शेअर या पातळीवर होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukesh Ambani Raises stake in reliance industries