रिलायन्स कंपनीच्या शेअर्समध्ये 7 टक्क्यांनी घट

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 2 November 2020

देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (RIL) शेअर्समध्ये 7 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (RIL) शेअर्समध्ये 7 टक्क्यांनी घसरण झाली आहे. तसेच शेअर्सची किंमत 1,900 रुपयांपेक्षा कमी झाली आहे.  'दैनिक भास्कर'ने यासंबंधीची बातमी दिली आहे.

आज मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये 1 लाख करोड रुपयांची कमी आली आहे. ही घट 13.89 लाख कोटी रुपयांवरुन 12.90 लाख कोटींपर्यंत आली आहे. एका आठवड्यात 1.36 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. याआधी मे महिन्यामध्ये एका दिवसात शेअर्समध्ये 7 टक्क्यांची घट झाली होती. या बातमीनंतर मॅक्वायरीने आरआयएलच्या शेअरमध्ये 42 टक्क्यांच्या घसरणीची रेंटिग दिली आहे. ब्रोकरेज हाऊसने म्हटलं की, शेअर्स अंडर परफॉर्म करतील आणि पुढे शेअर्सची किंमत 1,195 होऊ शकते. 

मोदी सरकार आणि सामान्यांसाठी खूशखबर, देशाच्या अर्थचक्राला येतेय गती

सोशल मीडियावर अंबानींच्या आजाराची चर्चा 

काही दिवसांपूर्वी जेष्ठ वकील हरीश साळवे यांच्या लग्नामध्ये मुकेश अंबानी यांनी वेबिनारच्या माध्यमातून उपस्थिती लावली होती. 

काही ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की फ्यूचर रिटेलसोबतचा करार आणि शनिवारी कंपनीने दाखवलेला खराब रिझल्ट यामुळे शेअरमध्ये हालचाल दिसली. पण, काहींचे म्हणणे आहे की रिझल्ट इतका खराब नाही की 7 टक्क्यांची घसरण होईल. यामागे दुसरे कारण आहे. 

सोमवारी सकाळी शेअर 7 टक्क्यांनी घसरुन 1940 रुपयांपर्यंत पोहोचले होते. चार महिन्यातील हा सर्वात कमी स्तर आहे. 23 ऑक्टोबरपासून आतापर्यंत कंपनीचा मार्कट कॅप 1 लाख करोड रुपये घटला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mukesh ambani Reliance Industries slips over 7 percent post Q2 results