ऑईल इंडियाच्या शेअर्सचा मल्टीबॅगर परतावा, पण आता गुंतवणूकदारांनी काय करावे?

ऑइल इंडिया लिमिटेडच्या शेअरबाबतही, जो गुरुवारी 6 टक्क्यांनी वाढून 297.15 रुपयांवर बंद झाला.
Oil India Limited Shares
Oil India Limited Sharessakal

Oil India Limited Shares: शेअर बाजारातील अस्थिरतेच्या काळात सरकारी कंपनीच्या (पीएसयू) शेअर्सनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिल्याचे क्वचितच होते आणि तेच झालंय ऑइल इंडिया लिमिटेडच्या शेअरबाबतही, जो गुरुवारी 6 टक्क्यांनी वाढून 297.15 रुपयांवर बंद झाला. ऑइल इंडियाचे शेअर्स गुरुवारी 306.00 रुपयांवर गेले, जे नोव्हेंबर 2014 नंतरचा ऑल टाईम हाय आहे. याआधी 9 सप्टेंबर 2014 रोजी ऑइल इंडियाच्या शेअर्सनी 334 रुपयांची पातळी गाठली होती आणि तेव्हापासून त्याची कामगिरी घसरली होती.

ऑइल इंडियाच्या शेअर्सनी गेल्या एका वर्षात त्यांच्या गुंतवणूकदारांना 111 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे, तर या कालावधीत सेन्सेक्स केवळ 5.77 टक्क्यांनी वाढला आहे.

Oil India Limited Shares
'हा' फार्मा स्टॉक देऊ शकतो दमदार परतावा; तज्ज्ञांचा विश्वास

गुंतवणुकदारांनी काय करावे?

ऑइल इंडियाच्या शेअर्समध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे HDFC सिक्युरिटीजने ऑइल इंडियाला 'BUY' रेटिंग दिले आहे. कच्च्या तेलाच्या आणि देशांतर्गत नैसर्गिक वायूच्या सरासरी किमतीत वाढ झाल्याने कंपनीच्या ऑपरेटिंग नफ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन त्यांनी 300 रुपयांचे टारगेट दिले आहे.

ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला ऑइल इंडियावर 350 रुपयांच्या टारगेटसह खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. तर ऑइल इंडियाच्या स्टॉकचे सरासरी टारगेट 333.5 रुपये आहे, जे या स्टॉकच्या सध्याच्या किमतीपेक्षा सुमारे 12.18 टक्के जास्त असल्याचे Trendlyne चे म्हणणे आहे.

Oil India Limited Shares
'हा' डिफेन्स शेअर येत्या वर्षात देईल दमदार परतावा

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा प्रति बॅरल 120 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. अमेरिकेतही पेट्रोलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचवेळी, चीनमध्ये लॉकडाऊन उठल्यानंतर तिथेही तेलाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत क्रूडच्या किमती काही काळ उच्च पातळीवर राहू शकतात.

गेल्या एका महिन्यात ऑइल इंडियाच्या शेअर्समध्ये 38.02 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर या वर्षाच्या सुरुवातीपासून त्याच्या शेअर्सची किंमत जवळपास 50 टक्क्यांनी वाढली आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com