
सध्या शेअर बाजारात बरंच अस्थिर वातावरण आहे, अशावेळ बाजारात पैसे गुंतवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. अशातच ब्रोकरेज हाऊस निर्मल बंग यांनी ग्लँड फार्मावर (Gland Pharma) विश्वास व्यक्त केला आहे. सध्या ग्लँड फार्मा (Gland Pharma) विकासाच्या मार्गावर असल्याचे ब्रोकरेज हाऊस निर्मल बंग यांचे म्हणणे आहे. राहू नये. कंपनीने स्मॉल मॉलिक्यूल व्यवसायात चांगला ठसा उमटवला आहे पण आणखी वाढ शक्य आहे शिवाय आवश्यकही आहे. लॉर्ज मॉलिक्यूलमध्ये (बायोलॉजिक्स ) मध्ये क्षमता वाढवण्याची गरज आहे. कंपनी अधिग्रहणाद्वारे व्यवसाय वाढवण्याच्या स्थितीत असल्याचे दिसते.
ग्लँड फार्मा स्टॉकला बाय रेटिंग देताना, निर्मल बंग यांनी त्यासाठी 3,575 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. ब्रोकरेज हाऊसचा असा विश्वास आहे की या स्टॉकमध्ये आणखी 27 टक्क्यांची वाढ सहज दिसून येईल. 2022 मध्ये आतापर्यंत स्टॉक 28 टक्क्यांनी घसरला आहे. त्याच वेळी, 1 वर्षाच्या कालावधीत, या स्टॉकमध्ये 10 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.
कंपनी आर्थिक वर्ष 2023 मध्ये तिच्या क्षमता विस्तारासाठी 300 कोटी रुपये खर्च करणार आहे. ज्याचा फायदा आर्थिक वर्ष 2024 पासून मिळू शकतो. ग्लँड फार्माचे लक्ष EBITDA मार्जिन वाढवण्यावर असेल असा विश्वास ब्रोकरेज हाऊसला आहे. मात्र, येत्या दोन वर्षांत यात काहीशी मंदी येण्याची शक्यता आहे.
वीज आणि इंधन खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीच्या EBITDA वर दबाव आला आहे, पण FY2025 पासून कंपनीच्या EBITDA मध्ये सुधारणा दिसून येईल आणि ती 35-37 टक्क्यांच्या आसपास राहू शकेल असा अंदाज आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.