जीएसटीमुळे खाद्य उद्योग क्षेत्राला चालना

पीटीआय
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

मुंबई - खाद्य उद्योगाला ‘एफएसएसएआय’ आणि वस्तू व सेवाकर प्रणालीच्या (जीएसटी) अंमलबजावणीत खाद्य उद्योगाला सुरवातीला त्रास झाला असला तरी, त्याचे दूरगामी परिणाम हे चांगलेच असतील, असा विश्वास खाद्यपदार्थ उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या ‘फूड इन्ग्रीडियण्ट्‌स इंडिया आणि हेल्थ इन्ग्रीडियण्ट्‌स’ परिषदेत या उद्योगातील संधीवर चर्चा करण्यात आली. 

अन्न आणि शीतपेय उद्योगातील क्रांतीमुळे नवीन उत्पादन विकासाला चालना मिळणार आहे. खाद्य उत्पादनांच्या वाढत चाललेल्या दर्जामागे सामाजिक-आर्थिक बदल कारणीभूत आहेत. परिणामी, या उत्कृष्ट खाद्यपदार्थांच्या दर्जामध्ये आणि मूलघटकांमध्येही सुधारणा होऊ लागल्याचे यूबीएम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश मुद्रस यांनी सांगितले. आरोग्याविषयी जागरूक असलेल्या ग्राहकांमध्ये वेलनेस आणि नैसर्गिक घटकांप्रती या परिषदेत माहिती देण्यात आली. भारतातील अन्न व खाद्य बाजारपेठ जगातील सहाव्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. एकूण विक्रीत ७० टक्के हिस्सा या उद्योगाचा आहे. अन्न प्रक्रिया उद्योगक्षेत्राचा ३२ टक्के हिस्सा असून, हे वेगाने वाढणारे उद्योगक्षेत्र आहे. उत्पादन, वापर, निर्यात आणि अपेक्षित वृद्धीच्या बाबतीत खाद्यक्षेत्र पाचव्या क्रमांकाचे उद्योगक्षेत्र आहे. या परिषदेला ‘एफएसएसएआय’चे संचालक पी. मुथुरामन, ‘एचएडीएसए’चे सचिव आर. बी. स्मार्त, ‘एएफएसटीआय’चे अध्यक्ष प्रबोध हळबे, यूबीएम इंडियाचे समूह संचालक राहुल देशपांडे आदी उपस्थित होते. 

Web Title: mumbai news GST Food industry