शेअर बाजारात सुधारणा : गुंतवणूकदारांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

मुंबई : मागील आठवड्यात शेअर बाजारात मोठीच घसरण झाली होती. आज (सोमवार) मात्र आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात सकारात्मक सूधारणा झाली.

शुक्रवारी शेअर बाजार सेन्सेक्स निर्देशांक 32,500 अंशाजवळ बंद झाला होता तर निफ्टी निर्देशांक 9,990 अंशाच्या पातळीवर बंद झाला होता. आज मात्र सेन्सेक्समध्ये सूधारणा होत तो 33,000 टप्पा ओलांडत स्थिरावला. त्याचबरोबर निफ्टी निर्देशांकात सूधारणा होत तो 10,000 च्या वर बंद झाला. गेल्या आठवड्यात शेअरबाजाराने या सत्रातली खालची पातळी गाठत गुंतवणूकदारांच्या तोंडचं पाणी पळवले होते.

आज शेअर बाजाराची सूरूवात काहीशी डळमळीतच झाली. परंतु, नंतर दिवसभरात बाजारात सूधारणा होत सकारात्मक वातावरण दिसलं. दिवसअखेर सेन्सेक्स निर्देशांक 469 अंशांची सुधारणा होत 33,066 अंशावर स्थिरावला. निफ्टी निर्देशांकांत 132 अंशांची सूधारणा होत तो 132 अंशांवर बंद झाला.

भारतातली बदलती राजकीय परिस्थिती आणि आंतरराष्ट्रिय पातळीवर अमेरिकेने व्यापार धोरणात केलेला बदल याचा नकारात्मक परिणाम जगभरातल्या शेअर बाजारावर दिसून आला. भारतीय शेअर बाजारसूद्धा त्याला अपवाद नव्हता. गेले दोन महीने सातत्याने बाजारात घसरण होताना दिसते आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आजच्या सकारात्मक वातावरणाने गुंतवणूकदारांना तात्पूरता दिलासा दिला. मात्र, येत्या काळात शेअर बाजारात चढउतार अपेक्षित आहेत.

Web Title: mumbai news share market sensex