esakal | दररोज वाचवा 50 रुपये आणि व्हा कोट्यधीश, कसे ? जाणून घ्या...
sakal

बोलून बातमी शोधा

Mutual-Fund

तुमचे कोट्यधीश होण्याचे स्वप्न एसआयपीच्या (SIP) माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करुन पूर्ण होऊ शकते. यासाठी तुम्ही दररोज फक्त 50 रुपये वाचवले तर निवृत्तीच्या वेळेपर्यंत तुम्ही सहजपणे कोट्यधीश होऊ शकता.

दररोज वाचवा 50 रुपये आणि व्हा कोट्यधीश, कसे ? जाणून घ्या...

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

- शिल्पा गुजर

सध्याच्या काळात प्रत्येकालाच कोट्यधीश व्हायचे आहे, नाही का? प्रत्येकजण कोट्यवधी रुपये बँक खात्यात ठेवण्याचे स्वप्न पाहत असतो. सर्वसामान्य लोकांसाठी एवढी मोठी रक्कम जोडणे सोपे नाही, पण कठीणही नाही बरे का. मर्यादित उत्पन्न आणि खर्चामुळे जास्त बचत होत नाही हेच याचे मुख्य कारण आहे, पण आज आम्ही तुम्हाला कोट्यधीश बनायचा एक साधा आणि सोपा मार्ग सांगणार आहोत. तुमचे कोट्यधीश होण्याचे स्वप्न एसआयपीच्या (SIP) माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करुन पूर्ण होऊ शकते. यासाठी तुम्ही दररोज फक्त 50 रुपये वाचवले तर निवृत्तीच्या वेळेपर्यंत तुम्ही सहजपणे कोट्यधीश होऊ शकता.

हेही वाचा: आर्थिक वर्ष 2021-22 पासून तुमची असू शकतात दोन पीएफ खाती

म्युच्युअल फंड एसआयपी (Systematic Investment Plan) अंतर्गत तुम्ही छोट्या मासिक गुंतवणुकीसह मोठी रक्कम जमा करू शकता. ही योजना दीर्घकाळासाठी अतिशय फायदेशीर आहे. कोट्यधीश होण्यासाठी तुम्ही तुमच्या करिअरच्या अगदी सुरुवातीपासूनच गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे. जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षापासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर त्याचा खूप फायदा होईल.

हेही वाचा: यापुढे दूरसंचार कंपन्या देणार नाहीत मोबाईल पोर्टिंगवर आकर्षक ऑफर!

वयाच्या 25 व्या वर्षीपासून गुंतवणूक

जर तुम्ही 25 वर्षांच्या वयापासून दररोज 50 रुपये वाचवायला सुरुवात केली आणि तुम्ही ते म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीद्वारे (Systematic Investment Plan) गुंतवत असाल, तर वयाच्या 60 व्या वर्षी तुम्ही सहजपणे कोट्यधीश व्हाल. म्हणजेच 35 वर्ष तुम्हाला दरदिवशी फक्त 50 रुपये वाचवावे लागतील.

जेव्हा तुम्ही दररोज 50 रुपये वाचवाल तेव्हा ते एका महिन्यात 1500 रुपये होतील. दुसरीकडे, म्युच्युअल फंड सरासरी 12-15 टक्के परतावा (Return) देतात. तुम्ही 35 वर्षांच्या दीर्घ कालावधीसाठी एकूण 6.3 लाख रुपये गुंतवले. यामध्ये 12.5 टक्के परतावा (Return) मिळाल्यावर त्याचे मूल्य 1.1 कोटी रुपये असेल.

हेही वाचा: LIC च्या IPO साठी सरकारने लॉ कंपन्यांकडून दुसऱ्यांदा मागवले RFP

30 व्या वर्षापासून गुंतवणूक

जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी गुंतवणूक करायला सुरुवात केली तर हा गुंतवणुकीचा कालावधी 5 वर्षांनी कमी होईल आणि तुम्ही फक्त 30 वर्ष गुंतवणूक करू शकाल. यामध्ये 30 वर्षांच्या कालावधीत 1500 रुपये प्रति महिना म्हणजे एकूण गुंतवणूक 5.4 लाख रुपये असेल. त्याची एकूण किंमत 59.2 लाख रुपये असेल. एकूणच, गुंतवणुकीचा कालावधी फक्त 5 वर्षांनी कमी केल्याने सुमारे 40 लाख रुपयांचे नुकसान होते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top