‘नक्षत्र वर्ल्ड’चा सेबीकडे आयपीओसाठी अर्ज

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मार्च 2017

मुंबई: गीतांजली जेम्सची उपकंपनी असलेल्या 'नक्षत्र वर्ल्ड'ने सेबीकडे आयपीओसाठी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस् (डीआरएचपी) दाखल केला आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून रु.650 कोटींचे भांडवल उभारू ईच्छित आहे.

कंपनीच्या संचालक मंडळाने प्राथमिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) परवानगी दिली आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार कंपनी भारताबरोबरच परदेशात दागिने निर्यात करते. कंपनीची मुंबई, जयपूर, सुरत, हैदराबादसह भारतात आठ उत्पादन केंद्र आहेत.

शुक्रवारी, मुंबई शेअर बाजारात गीतांजली जेम्सचा शेअर 63.35 रुपयांवर व्यवहार करत 2.46 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. दहा रुपये दर्शनी किंमत असलेल्या शेअरने वर्षभरात 29.95 रुपयांची नीचांकी तर 93.60 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.751.43 कोटींचे बाजारभांडवल आहे.

Web Title: Nakshatra World submits IPO papers with SEBI