कर्ज घेण्यासाठी सर्वात चांगली संधी, जाणून घ्या व्याजदरातील नवीन बदल

loan interest
loan interest

नवी दिल्ली: दिवाळीच्या मुहूर्तावर कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी एक खूशखबर आहे. दिवाळीच्या तोंडावर जर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करण्याचा विचार करत असाल तर एक चांगली संधी आहे. कारण HDFC सह देशातील इतर प्रमुख बॅंका कमी व्याजदरात होम लोन देत आहेत. आज आपण या लेखात कोणत्या बॅंकेने व्याजदरात किती घट केली आहे, हे जाणून घेणार आहोत.

HDFC- 
होम लोन देणारी एचडीएफसी लिमिटेडने त्यांच्या मुख्य व्याजदरात सोमवारी 0.10 टक्क्यांची घट केली आहे. एचडीएफसीने एका प्रसिध्दीपत्रात सांगितले की, 'एचडीएफसीने होम लोनच्या व्याजदरात 0.10 टक्क्यांची घट केली आहे. हे नवीन बदल 10 नोव्हेंबर 2020 पासून लागू होणार आहेत.' हे कमी केलेले व्याजदर ग्राहकांसाठी फायद्याचे ठरणार आहेत.

यूनियन बॅंक ऑफ इंडिया-
देशातील एक मुख्य असणारी बॅंक यूनियन बॅंक ऑफ इंडियानेही त्यांच्या व्याजदरात घट केली आहे. या बॅंकेने 30 लाख रुपयांपेक्षा जास्त होम लोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी व्याजदरात  0.10 टक्क्यांची सूट दिली जाणार आहे. बॅंकेने त्यांच्या होम लोनच्या व्याजदरात 0.10 टक्क्यांची घट केली आहे. तसेच हे कर्ज महिलेच्या नावावर घेत असेल तर तिला आणखी 0.05 टक्क्यांची सूट मिळणार आहे. हे सर्व धरून जर महिला यूनियन बॅंक ऑफ इंडिया बॅंकेत होम लोन घेत असतील तर त्यांच्यासाठी असणाऱ्या व्याजदरात 0.15 टक्क्यांची घट केली जाणार आहे.

प्रोसेसिंग फी 'शून्य रुपये'- 
यासोबतच या बॅंकांनी 31 डिसेंबर 2020 पर्यंत होम लोनची प्रोसेसिंग फी शून्य रुपये केली आहे. बॅंकांनी सांगितले की हे सर्व बदल 1 नोव्हेंबर 2020 पासून लागू झाले आहेत. यासोबतच शिक्षण आणि वाहन कर्जाची प्रोसेसिंग फीही शून्य केली आहे.

बॅंक ऑफ बडोदा-
बॅंक ऑफ बडोदा जी सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बॅंक आहे तिने रेपो दरावर आधारित कर्जावरील व्याजदारातील (Baroda Repo Linked Lending Rate) 0.15 टक्क्यांची कपात शनिवारी जाहीर केली आहे. यामुळेच आता गृहकर्जांसाठी असणारं व्याज दर 6.85 टक्के राहणार आहे. हे नवीन नियम बॅंक 1 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत.  

गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज आणि वैयक्तिक कर्जे घेणाऱ्यांना होईल फायदा-
पुढील काही दिवस सणांचे असल्याने गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज आणि वैयक्तिक कर्जे घेणाऱ्या ग्राहकांना बॅंकेच्या या निर्णयाचा मोठा फायदा होईल, असं मत बँक ऑफ बडोदाचे महाप्रबंधक हर्षदकुमार सोळंकी यांनी व्यक्त केलं आहे. रेपो दरावरील आधारित व्याजदरातील कपातीमुळे इथून पुढे गृहकर्जावर 6.85 टक्के, वाहन कर्जांवर 7.10 टक्के आणि शैक्षणिक कर्जांवर 6.85 टक्के दराने व्याज आकारण्यात येणार असल्याचे बॅंक ऑफ बडोदाच्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com