‘एनपीएस’मधून अंशत: पैसे काढण्यास परवानगी

पीटीआय
शुक्रवार, 4 मे 2018

नवी दिल्ली - उच्च शिक्षण आणि नवीन उद्योग सुरू करण्यासाठी नॅशनल पेन्शन सिस्टिममधून (एनपीएस) अंशत: पैसे काढण्यासाठी पेन्शन फंड नियामकाने मंजुरी दिली आहे. गेल्या आठवड्यात पेन्शन फंड नियामक प्राधिकरणाच्या (पीएफआरडीए) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

‘पीएफआरडीए’कडून एनपीएस आणि अटल पेन्शन योजनेचे व्यवस्थापन केले जाते. देशभरात एनपीएस आणि अटल पेन्शन योजनेचे २ कोटी १३ लाख सभासद असून, २.३८ लाख कोटींचा निधी आहे. एनपीएस सभासदांना उच्च शिक्षण घेण्यासाठी एनपीएस खात्यातून अंशत: पैसे काढण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर सभासदाला नवीन उद्योग सुरू करण्यासाठी एनपीएस खात्यातून पैसे काढता येणार आहेत. एनपीएस निधीची इक्विटीमधील गुंतवणूक मर्यादा ७५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढवण्यास संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. ५० वर्षांपर्यंतच्या एनपीएस सभासदांच्या खात्यातून इक्विटीमध्ये जादा गुंतवणूक केली जाईल, असे ‘पीएफआरडीए‘ने म्हटले आहे.

Web Title: national pension scheme money