आजपासून काय बदलणार? माहिती करून घ्या

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 1 December 2020

आजपासून देशात काही मोठे बदल लागू होणार आहेत

नवी दिल्ली: सध्या कोरोनामुळे बऱ्याच सुविधा बंद आहेत. आजपासून देशात काही मोठे बदल लागू होणार आहेत. जे थेट सामान्य माणसांच्या जीवनाशी निगडीत आहेत. यामध्ये कोरोना मॉनिटरिंग, प्रतिबंध आणि सतर्कतेसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तसेच बँकिंग नियमांमधील बदल समाविष्ट असणार आहेत. नेमकं आजपासून देशात काय बदलणार आहे ते जाणून घेऊया.

कोरोना संबंधित नवीन गाईडलान्स-
नवीन सुचनांमध्ये देशात कोरोनाचा प्रसार कमी करण्याचे मोठे आवाहन सरकारसमोर असणार आहे. गर्दी न करणे , SOP's चे पालन करणे बंधनकारक असणार आहे. राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना जिल्हा प्रशासनाद्वारे ग्रामीण स्तरावरील लक्ष द्यावं लागणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेला परवानगी असणार आहे. सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी मास्क जर नाही घातला तर राज्य आणि केंद्र सरकार कारवाई करणार आहेत. यामध्ये विविध राज्यांनी वेगवेगळे दंड आकरण्यास सुरुवात केली आहे.

Signs of economic revival: क्रेडिट कार्डच्या मागणीत होतेय वाढ

PNB ATMमधून पैसे काढण्याच्या नियमात बदल-
1 डिसेंबरपासून PNB 2.0 (PNB, eOBC, eUNI) वन टाइम पासवर्ड (OTP) आधारित रोख काढण्याची सुविधा सुरू होणार आहे. 1 ते 8 डिसेंबर या कालावधीत पीएनबी 2.0 एटीएममधून एकावेळी 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम काढायचे असतील तर आता त्यासाठी ओटीपी टाकणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे आता पीएनबी ग्राहकांना रात्रीच्या वेळेत 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी ओटीपीची गरज लागणार आहे त्यामुळे आता पैसे काढताना सोबत मोबाईल असणे गरजचे असणार आहे.

RTGS सुविधा 24×7 असणार-
रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) सुविधा 1 डिसेंबरपासून 24 तास आणि आठवड्याचे सात दिवस उपलब्ध असणार आहे. ग्राहकांना आरटीजीएसच्या माध्यमातून वर्षातील 365 दिवस कधीही पैशांचा व्यवहार करता येणार आहे. आरटीजीएस प्रणाली सध्या महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार वगळता आठवड्याच्या सुट्ट्यासोडून सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरु आहे.

Tata Motorsची भन्नाट आयडिया; नवीन कारची 'सेफ्टी बबल'द्वारे विक्री

नवी रेल्वे सुरु-
मुंबई-हावडाडेली सुपरफास्ट ट्रेन 1 डिसेंबरपासून पुन्हा सुरू होत आहे. मुंबई-हावडा ट्रेन जुन्या वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहे. जबलपूर-नागपूर विशेष गाडीही 1 डिसेंबरपासून सुरू होत आहे. लॉकडाउन झाल्यापासून या ट्रेनची सेवा बंद करण्यात आली होती. रेवा स्पेशल आणि सिंगरौली स्पेशल ट्रेनही 1 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. याशिवाय झेलम एक्स्प्रेस आणि पंजाब मेलही पुन्हा धावणार आहेत.

LPG
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किंमती बदलत असतात. पण मागील सहा महिन्यांत LPGच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. डिसेंबरमध्ये एलपीजीच्या किंमती वाढतात की कमी होतील हे पाहावे लागेल.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new changes from 1 december 2020 in the country