esakal | महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी प्रवीणसिंह परदेशी की सीताराम कुंटे; उद्धव ठाकरेंची चर्चा

बोलून बातमी शोधा

praveensinh pardeshi seetaram kunte}

महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी प्रवीणसिंह परदेशी यांना नेमायचे की सीताराम कुंटे यांना, याबाबतचा विचार उच्चस्तरावर सुरू आहे. आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन्ही अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. दोघेही एकाच तुकडीचे अधिकारी आहेत. सेवेचे निकष लावता परदेशी ज्येष्ठ आहेत.

arthavishwa
महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी प्रवीणसिंह परदेशी की सीताराम कुंटे; उद्धव ठाकरेंची चर्चा
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी प्रवीणसिंह परदेशी यांना नेमायचे की सीताराम कुंटे यांना, याबाबतचा विचार उच्चस्तरावर सुरू आहे. आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन्ही अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. दोघेही एकाच तुकडीचे अधिकारी आहेत. सेवेचे निकष लावता परदेशी ज्येष्ठ आहेत. कोरोना काळात मुंबईतील बाधितदर नियंत्रणात येत नसल्याने परदेशी यांना महापालिका आयुक्त पदावरून हटवण्यात आले होते. दुखावलेले परदेशी नंतर लगेचच राष्ट्रसंघात विशेष सेवेसाठी रवाना झाले. केवळ काही दिवसांपूर्वी ते  भारतात परत आले असून प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्याने महाराष्ट्र केडरमध्ये सामावून घेण्याचे पत्र त्यांनी राज्य सरकारला सादर केले आहे. आज सकाळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सिताराम कुंटे सध्या गृहखात्याची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी या पूर्वी महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली होती. कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची प्रतिमा असून त्यांची निवड झाल्यास महाराष्ट्राला मराठी मुख्यसचिव मिळेल.

Edited By - Prashant Patil