1 हजार रुपयांच्या नोटा लवकरच येणार

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली : एक हजार रुपयांची नवी नोट सरकारकडून लवकरच चलनात आणली जाणार आहे. केंद्रीय अर्थ खात्याचे सचिव शक्तिकांत दास यांनी याबाबतची माहिती दिली. 

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यावर केवळ दोन हजारच्या नोटा चलनात येणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. मात्र, पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांसह लवकरच एक हजारांच्याही नवीन नोटा चलनात येणार आहेत.  

त्याचबरोबर आता सरकारने एक हजार रुपयांची नवीन नोट बाजारात आणणार असल्याचे जाहीर केले आहे. एक हजार रुपयांची नवीन नोट अधिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह चलनात आणली जाणार असल्याचे केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच येत्या काळात सर्वच नोटा बदलून त्या चलनात आणल्या जाणार असल्याचेची त्यांनी सांगितले. एक हजार रूपयांची नवीन नोट लवकरच चलनात आणली जाणार असून ती नव्या रंगात आणि आकारात असणार आहे.

मंगळवारी मध्यरात्रीपासून पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्याचा सरकारने निर्णय घेतला. आज (गुरुवार) सकाळी 8.30 वाजल्यापासून बँकांमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांची रांगा लावल्या आहेत. शिवाय आता दोन हजार रूपयांची नवी नोटही बाजारात आली आहे.
 
Web Title: new currency notes of 1000 will be out soon