भारतात नवीन 'जग्‍वार एक्‍सई' सादर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

मुंबई, ता. ४ : जग्‍वार लँड रोव्‍हर इंडियाने बुधवारी (ता. 4) नवीन जग्‍वार एक्‍सई ही कार बाजारात सादर केली.  'एस' आणि 'एसई' अशा दोन प्रकारतील ही गाडी पेट्रोल आणि डिझेल अशा दोन पर्यांमध्ये उपलब्ध आहे. मुंबईत या गाडीच्या सादरीकरण समारंभावेळी जग्‍वार लँड रोव्‍हर इंडियाचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक रोहित सुरी हे उपस्थित होते.

नवीन जग्‍वार एक्‍सई ही पूर्वीच्या जग्वार गाड्यांपेक्षा अधिक मोठी आणि आरामदायक आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्तम अंतररचनायुक्त नवीन एक्सईमध्ये गिअरबॅाक्समध्ये बदल करण्यात आले आहेत. सुधारित सेंटर कंसोलवरील एफ-टाइपप्रमाणे जग्‍वार स्‍पोर्टशिफ्ट सिलेक्‍टर ८-स्‍पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्‍स बसविण्यात आला आहे. ज्यामुळे चालक जलदगतीने गिअर बदलू शकतो. यासह स्मार्ट फोनकरीता स्‍मार्टफोन पॅक स्क्रिन देखील या गाडीत बसविण्यात आली आहे. तसेच 'इनकंट्रोल रिमोट अॅप' या अॅपमुळे बाहेरील हवामान, वाहतूक कोंडी इत्यादींची माहिती चालकाला मिळू शकते.

तसेच फोनच्‍या माध्‍यमातून इंधनाची पातळी, खिडकी खोलणे आदि सुविधाही चालकाच्या बोटांवर उपलब्ध झाल्या आहेत. तंत्रज्ञानासह आतील संपूर्ण डिझायीन देखील आधुनिक असून फ्रण्‍ट अॅर्पेचर्स, आकर्षक ग्राफिक्‍स आणि उत्तम दर्जाच्या आसने ही गाडीत बसविण्यात आली आहेत. या गाडीच्या सुरुवातीच्या मॅाडेलची एक्स शोरुम किंमत 45 लाखांच्या आसपास आहे.

'जग्‍वार एक्‍सई ही खासकरुन डिझाइन करण्‍यात आलेली खास स्‍पोर्टस् सलून आहे. ही गाडी उत्तम कामगिरीची खात्री आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे एक उत्‍तम उदाहरण आहे. त्यामुळे आम्‍हाला विश्‍वास आहे की, ही नवीन जग्वार आमचे जग्‍वार चाहते आणि इतर वाहनग्राहकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल. : रोहित सुरी, अध्‍यक्ष, जग्‍वार लँड रोव्‍हर इंडिया.

web title : new jaguar xe launched in india

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new jaguar xe launched in india