2020 मध्ये स्टार्टअप्सची संख्या घटली; 75 टक्क्यांहून अधिक पडणार बंद?

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 4 January 2021

2020 वर्ष कोरोना महामारीसाठी ओळखं जाईल. या वर्षात अनेक लोकांचा रोजगार गेला, अनेकांचे व्यवसाय बंद पडले

नवी दिल्ली- 2020 वर्ष कोरोना महामारीसाठी ओळखं जाईल. या वर्षात अनेक लोकांचा रोजगार गेला, अनेकांचे व्यवसाय बंद पडले. स्टार्टअप सुद्धा यापासून वाचू शकलेले नाहीत. नव्या टेक स्टार्टअप्समध्ये 2020 मध्ये 44 टक्क्यांची घट झाली आहे. 2019 मध्ये एकूण नव्या टेक स्टार्टअपची संख्या 5,509 होती, ते 44.4 टक्क्यांनी कमी होऊन 3,061 झाले आहेत. 

'स्टॅलिन यांना CM होऊ देणार नाही'; तमिळनाडूत भावात-भावात संघर्ष पेटला

2020 मध्ये टेक स्टार्टअप्सद्वारे जमवण्यात आलेली एकूण इक्विटी फंडिंग (Equity Funding) 30.9 टक्क्यांनी घटून 11.4 अब्ज डॉलर झाली आहे.  2019 मध्ये हा आकडा 16.5 अब्ज डॉलर होता. मागील वर्षात सर्वात लोकप्रिय बायजूस आणि अनअॅकेडेमी सारखे मॉडल्स, फू़ड डिलिवरी, डिजिटल वॉलेट्स, इंटरनेट फर्स्ट रेस्टॉरेंट्स, ई-कॉमर्स लॉजिस्टिक्स सर्विसेस, वर्नाकुलर न्यूज अॅग्रीगेटर्स अशा मॉडल्सचा समावेश आहे. 

सध्या भारतात 73,000 पेक्षा अधिक स्टार्टअप्स आहेत, ज्यातील 8 हजारपेक्षा अधिक फंडेड स्टार्टअप्स आहेत. एका मीडिया रिपोर्टच्या दाव्यानुसार असा अंदाज लावण्यात आलाय की 75 टक्क्यांमध्ये अधिक स्टार्टअप्स येत्या काळात बंद पडतील. 'न्यूज 18'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

मेस्सीने गाठला 500 चा पल्ला; तरीही तो दुय्यमच!

रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय की येत्या 12 महिन्यात कोरोना महामारीमुळे देशातील 75 टक्के स्टार्टअप्स बंद पडतील. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, स्टार्टअप्समध्ये जोखीम असते. स्टार्टअप्स सुरु करणारे मेहनतीने प्रोडक्ट तयार करत असतात. ग्राहकांच्या मागणीनुसार ते प्रोडक्ट निर्माण करत असतात, तसेच आवश्यक त्या सुधारणाही त्यात करत असतात. पण, कोरोना महामारीच्या काळात त्यांच्यासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली. अनेकांना आपले स्टार्टअप्स बंद करावे लागले. कोरोना महामारीचा प्रभाव किती काळ राहिल, हे सांगतात येत नाही. काही स्टार्टअप्स अजूनही तग धरुन आहेत, तर काही पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new Startups fallen by 44 percent 75 percent will shutdown in next 12 months