esakal | 'स्टॅलिन यांना CM होऊ देणार नाही'; तमिळनाडूत भावात-भावात संघर्ष पेटला
sakal

बोलून बातमी शोधा

mk stalin and alagiri.

डीएमकेतून हकालपट्टी झालेले नेते एमके अलागिरी यांनी रविवारी मदुरैतील रोडशोदरम्यान राजकारणात पुन्हा येण्याचे संकेत दिले आहेत.

'स्टॅलिन यांना CM होऊ देणार नाही'; तमिळनाडूत भावात-भावात संघर्ष पेटला

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- डीएमकेतून हकालपट्टी झालेले नेते एमके अलागिरी यांनी रविवारी मदुरैतील रोडशोदरम्यान राजकारणात पुन्हा येण्याचे संकेत दिले आहेत. या दरम्यान त्यांच्या समर्थकांनी 'अंजा नेंजम' म्हणजे हिंमतवानचे नारे दिले. अलागिरीने डीएमके अध्यक्ष आणि बंधू एमके स्टॅलिन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. स्टॅलिन कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत. मी आणि माझे समर्थक असं कधीही होऊ देणार नाही, असं ते म्हणाले आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे अमेरिकेतील राजकारणात खळबळ

माजी केंद्रीय मंत्री आणि एम करुणानिधीचे पुत्र अलागिरी यांनी तमिळनाडू विधानसभा निवडणुकीआधी अॅक्शन प्लॅनसंबंधी चर्चा केली. त्यांनी जाहीर केलं की ते लवकरच त्यांच्या पुढच्या निर्णयाची घोषणा करणार आहेत आणि त्यांच्या समर्थकांनी हा निर्णय स्वीकारला पाहिजे. अलागिरी म्हणाले की, मला आतापर्यंत कळालं नाही की मी काय चुकीचं केलं ज्यामुळे मला डीएमकेमधून काढण्यात आलं. स्टॅलिनने मला धोका दिला. 

मला कोणत्याही पदाची अपेक्षा नव्हती

मी पुढे जात असल्याचं पाहून स्टॅलिनमध्ये इर्षा निर्माण झाली होती. मला माहिती नाही, माझ्यासोबत धोका का करण्यात आला. मी केवळ पक्षाचा एक नेता बनून राहू इच्छित होतो. मी कधीही कोणत्या पदाची अपेक्षा केली नाही. आम्ही मदुरैला डीएमकेच्या गढामध्ये बदललं, कधी हा एमजीआरचा गढ होता, असं अलागिरी म्हणाले.  

आता रामदेव बाबाही म्हणतात कोरोना लस घेणार नाही

स्टॅलिन यांच्यावर टीका करत अलागिरी म्हणाले की, येथील पोस्टरमध्ये तुम्हाला भविष्यातील सीएम म्हणून दाखवलं जात आहे, पण असं होणार नाही. माझे समर्थक कधीही तुम्हाला मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत. स्टॅलिन यांची तुलना करुणानिधी यांच्यासोबत केल्यावरुन अलागिरी म्हणाले की, स्टालिन यांची तुलना करुणानिधी यांच्यासोबत कशी होऊ शकते. मला हे ऐकून लाज वाटली. हे लोक स्टॅलिन यांची तुलना करुणानिधींसोबत कसं करु शकतात?

मी सात वर्षापर्यंत गप्प राहिलो

अलागिरी यांनी दावा केला की, त्यांनी अनेक वेळा डीएमकेला वाचवले आहे, पण स्टॅलिन यांनी पदाच्या इच्छेने केवळ त्यांचा वापर करु घेतला. मी सात वर्षांपर्यंत गप्प राहिलो. माझे समर्थक मला नवा पक्ष बनवण्यास सांगत आहेत. मी लवकरच निर्णय घेईन. पण, माझा जो निर्णय असेल तो समर्थकांनी स्कीकारावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. 

loading image