esakal | दोन महिने अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचे - रजनीश कुमार
sakal

बोलून बातमी शोधा

दोन महिने अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचे - रजनीश कुमार

दोन महिने अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचे - रजनीश कुमार

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था मागील सहा वर्षातील सर्वात मोठ्या मंदीला सामोरी जात आहे त्यामुळे पुढील दोन महिने देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्राची परिस्थिती पाहता ही मंदी चढउताराचाच भाग आहे की अर्थव्यवस्थेतील रचनात्मक बाबींमुळेच ही मंदी आली आहे, याकडे पाहणे महत्त्वाचे ठरेल, असे मत स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी व्यक्त केले आहे.

मंदीचा तडाखा; 400 कामगारांना बाहेरचा रस्ता

सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे विलीनीकरण करण्याच्या निर्णयाचे त्यांनी समर्थनदेखील केले. जर आपण ऑटोमोबाईल क्षेत्राकडे पाहिले तर ते क्षेत्र खूप मोठ्या उलथापालथीला सामोरे जात आहे. त्याचबरोबर पर्यावरणाशीसंबंधित मुद्देही आहेत. ग्राहकांचा दृष्टीकोनसुद्धा मोठ्या प्रमाणावर बदलतो आहे. त्यामुळेच ही मंदी चढउताराचाच एक भाग आहे की मूलभूत रचनात्मक कारणांमुळे आहे हे सांगणे कठीण आहे. मात्र, आक्टोबर आणि नोव्हेंबर हे दोन महिने देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी खूपच महत्त्वाचे आहेत, असेही रजनीश कुमार पुढे म्हणाले.

चांदीची चमक वाढली

स्टेट बॅंकेने आयोजित केलेल्या बॅंकिंग आणि इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते. आगामी उत्सवी काळ हा पारंपारिकरित्या बाजारपेठेसाठी मोठ्या घडामोडींचा असतो. त्यामुळेच देशातील ग्राहकांची क्रयशक्ती किती आहे हे त्यातूनच समोर येणार आहे. बॅंकांच्या विलीनीकरणाची सूचना ही 25 वर्षांपासूनची आहे. हे होणे आवश्यकच होते, असेही रजनीश कुमार म्हणाले. भारताने जूनअखेर मागील सहा वर्षांमधील सर्वात निचांकी म्हणजेच 5 टक्के विकासदर नोंदवला आहे.

loading image
go to top