esakal | मंदीचा तडाखा : सर्वात मोठ्या गृहनिर्माण कंपनीकडून 400 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता
sakal

बोलून बातमी शोधा

मंदीचा तडाखा : सर्वात मोठ्या गृहनिर्माण कंपनीकडून 400 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता

मॅक्रोटेक या देशातील सर्वात मोठ्या रिअॅल्टी डेव्हलपरने 400 कर्मचाऱ्यांना ले-ऑफ दिले आहेत. मॅक्रोटेक डेव्हलपर लि.ने (पूर्वाश्रमीची लोढा समूह) मध्यम पातळीवरील कर्मचारी, कंत्राटी कामगार, इंजियनियर, आर्किटेक्ट, विपणन कर्मचारी आणि प्रत्यक्ष प्रकल्पाच्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी असे सर्व प्रकारातील कर्मचाऱ्यांना ले-ऑफ दिले आहेत.

मंदीचा तडाखा : सर्वात मोठ्या गृहनिर्माण कंपनीकडून 400 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मॅक्रोटेक या देशातील सर्वात मोठ्या रिअॅल्टी डेव्हलपरने 400 कर्मचाऱ्यांना ले-ऑफ दिले आहेत. मॅक्रोटेक डेव्हलपर लि.ने (पूर्वाश्रमीची लोढा समूह) मध्यम पातळीवरील कर्मचारी, कंत्राटी कामगार, इंजियनियर, आर्किटेक्ट, विपणन कर्मचारी आणि प्रत्यक्ष प्रकल्पाच्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी असे सर्व प्रकारातील कर्मचाऱ्यांना ले-ऑफ दिले आहेत.

चांदीची चमक वाढली; असा आहे चांदीचा आजचा भाव

कंपनीवरील कर्जाचा बोझा, रोकडचा अभाव आणि सध्याची गृहनिर्माण व्यवसायातील मंदी यामुळे कंपनीने हे पाऊल उचलले आहे. सध्या मॅक्रोटेकच्या 42 गृहनिर्माण प्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे. यात प्रसिद्ध वर्ल्ड टॉवर्स, लोढा पार्क आणि मुंबईतील अनेक गगनचुंबी इमारतींचा समावेश आहे.

शेअर बाजार अखेर सावरला

इक्रा या मानांकन संस्थेनुसार मध्य मुंबईत जवळपास 45,000 कोटी रुपयांची मालमत्ता जूनअखेर विक्रीविना पडून आहे. आगामी काळात कोणतेही मोठे प्रकल्प सुरू करणार नसल्याने कंपनीने कर्मचाऱ्यांना ले-ऑफ देणेच पसंत केले आहे. निवासी प्रकल्पांबरोबरच कंपनी व्यावसायिक इमारती, वेअरहाऊस यांचेही बांधकाम करते. कंपनीत एकूण 3,700 कर्मचारी काम करतात.

मंदीचा इफेक्ट : मारुती ठेवणार उत्पादन बंद

अनेक प्रकल्पांवर काम सुरू असतानाही कंपनीची आर्थिक स्थिती चांगली नाही. मॅक्रोटेकने आयपीओच्या माध्यमातून 4,500 कोटी रुपयांची उभारणी करण्याचीही योजना आखली होती. कर्जाची परतफेड करण्यासाठी कंपनी भांडवल उभारणी करणार होती.

loading image
go to top